पुणे - देशांतर्गत कांद्याची आवक घटल्याने कांद्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे आता परदेशातून कांदा भारतात आयात केला जात आहे. पुण्यातील मार्केट यार्डमध्ये तुर्कस्तानच्या कांद्याची आवक झाली आहे. आतापर्यंत परदेशातून दाखल झालेल्या कांद्यापैकी तुर्कस्तानच्या कांद्याला सर्वाधिक 80 रुपये किलो भाव मिळाला आहे.
हेही वाचा - कांद्याने सामान्यांच्या डोळ्यात आणले पाणी, राज्यात कांद्याचे दराने गाठला उच्चांक
पुण्यामध्ये पाच ते सहा कंटेनर कांद्याची आवक झाली आहे. प्रत्येक कंटेनरमध्ये 25 ते 30 टन कांदा आहे. परदेशातून आयात केलेल्या कांद्यापैकी अफगाणिस्तानच्या कांद्याचा दर्जा चांगला आहे. त्याला देखील चांगली मागणी असल्याचे व्यापारी सांगतात.
देशांतर्गत बाजारपेठांमध्ये वाढलेल्या दरामुळे त्याचबरोबर महाराष्ट्रातील जुन्या कांद्याचा संपत चाललेला स्टॉक याचा विचार करता कांद्याला चांगली मागणी आहे. महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका कांद्याला बसला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात कांदा खराब झालेला आहे. या परिस्थिती परदेशातून कांदा पुण्यात आयात झाला आहे.