मुंबई- परिवहन मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय असलेल्या संजय कदम ( IT raids on Sanjay Kadams house ) यांच्या घरी प्राप्तिकर विभागाची छापेमारी सुरुच आहे. 31 तास उलटून गेले तरी अनिल परब यांचे निकटवर्तीय असलेल्या संजय कदम यांच्या घरी छापेमारी सुरूच आहे. प्राप्तिकर विभागाच्या 4 टीम बुधवारी पहाटेपासून इथे महत्त्वपूर्ण कागदपत्र ( 4 IT teams at Mumbai ) गोळा करत आहेत.
अंधेरी पश्चिमेकडील अपना बाजारमधील स्वान लेक या ( Swan lake ) इमारतीतील 16 व्या मजल्यावर संजय कदम यांचे घर आहे. संजय कदम अनिल परब यांचे निकटवर्तीय आहेत. ते एक केबल व्यावसायिक आहेत. तसेच संजय कदम यांचे मावसभाऊ संजय साखळे यांच्या घरावरदेखील ( IT raids on Sanjay Sakhale home ) प्राप्तिकर विभागाकडून छापेमारी सुरुच आहे.
हेही वाचा-वेतन कपात हा खोडसाळपणा केवळ माथी भडकवण्यासाठी - मंत्री अनिल परब
अनिल परब यांची चौकशी होण्याची शक्यता
मंत्री अनिल परब यांच्या सीएच्या घरावरसलग दुसऱ्या दिवशी सुद्धा आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे. व्ही एस परब असोसिएट असे या सीए फर्मचे नाव आहे. प्राप्तिकर विभागाकडून सुरू असलेल्या छापेमारी शिवसेनेचे नेते तथा पदाधिकारी असल्याने पुन्हा महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. प्राप्तिकर विभागाकडून सुरू असलेल्या छापेमारीमध्ये अनेक महत्त्वाचे कागदपत्र संबंधित तपास यंत्रणेच्या हाती लागले असल्याची लेखी माहिती सूत्रांकडून मिळाली आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मंत्री अनिल परब यांचीदेखील चौकशी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
हेही वाचा-ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यासाठी राज्य सरकार नेमणार समिती