ETV Bharat / city

Dagdusheth: दगडूशेठच्या पंचकेदार मंदिर सजावटीचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन - चंद्रकात पाटील गणेश पुजा पुणे

पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३० व्या वर्षी गणेशोत्सवात श्री पंचकेदार मंदिर साकारण्यात आले आहे. ( Dagdusheth ) लक्ष, लक्ष दिव्यांनी व विविधरंगी लाईटसने उजळलेल्या या मंदिराचे उद्घाटन राज्याचे उच्च तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले.

दगडूशेठ
दगडूशेठ
author img

By

Published : Aug 31, 2022, 10:57 PM IST

Updated : Aug 31, 2022, 11:07 PM IST

पुणे - पुण्यामध्येच नाही तर संपूर्ण जगभरात गणेश हे श्रद्धास्थान आहे. लाखो गणेशभक्त दगडूशेठच्या दर्शनासाठी आसुसलेले असतात. आज जगभरातून इंटरनेटच्या माध्यमातून देखील शेकडो भक्त दर्शन घेत आहेत. कोविड संकटानंतर उत्साह व आनंद देणारा हा उत्सव आहे अशी प्रतिक्रिया चंद्रकात पाटील यांनी यावेळी दिली. यावेळी ट्रस्टचे हेमंत रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, अक्षय गोडसे, अमोल केदारी, मंगेश सूर्यवंशी, राजाभाऊ पायमोडे, सुनील जाधव यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दगडूशेठच्या पंचकेदार मंदिर सजावटीचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

दोन्ही बाजूस १८ मोरांच्या रांगा - पंचकेदार मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या आडव्या भागावर, दोन्ही बाजूस असलेल्या गवाक्षात एकूण २८ सुरसुन्दरी आहेत. या सुरसुन्दरी ७ आणि ७ अशा गटांत असून सप्त नद्या, सप्त सुरु यांच्या प्रतिनिधी आहेत. त्याच्या खालच्या आडव्या पट्ट्यात गंधर्व, स्त्री-पुरुष नृत्य, गायन करत आहेत. असा हा शिखराचा भाग अनेक शिवगण, सुरसुन्दरी, गंधर्व, शार्दुल, नाग इत्यादींनी व्यापलेला आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस स्तंभाच्या रांगा आहेत. या स्तंभांच्या वरती दोन्ही बाजूस १८ मोरांच्या रांगा असून, स्तंभांच्या मध्य भागावर, बाहेरच्या बाजूने कमळनाळ घेतलेल्या ४४ सुरसुन्दरी प्रत्येक बाजूवर आहेत. तर आतल्या भागावर असलेल्या सुरसुन्दरी नमस्कार मुद्रेत असून त्या गणेश भक्तांना नमन करत आहेत. मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूच्या स्तंभांवर मोद, प्रमोद नावाचे गणेशाचे द्वारपाल उभे आहेत. तर त्यांच्या बाजूला दोन भैरव मूर्ती देखील आहेत.

ॠषिपंचमीनिमित्त ३१ हजार महिलांचे अर्थवशीर्ष पठण उद्या गुरुवार, दिनांक १ सप्टेंबर रोजी पहाटे ६ वाजता ॠषिपंचमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे ३१ हजार महिला सामुदायिकरित्या अर्थवशीर्ष पठण करणार आहेत. यावेळी प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल, परिमंडळ १ च्या पोलीस उपायुक्त डॉ.प्रियांका नारनवरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. रात्री १० ते पहाटे ३ वाजेपर्यंत हरी जागर च्या माध्यमातून महाराष्ट्रातील समस्त वारकरी बंधू वारकरी गजर करीत गणरायाचरणी सेवा अर्पण करणार आहेत. याशिवाय सूर्यनमस्कार, वेदपठण, महिला हळदीकुंकू असे विविध कार्यक्रम होणार आहेत.

हेही वाचा - Paola Maino: काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींच्या आईचे निधन; वाचा, कुटुंबाविषयी सविस्तर

Last Updated : Aug 31, 2022, 11:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.