पुणे - कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य शासनाने निर्बंध शिथिल केले आहेत. दुकान, हॉटेलच्या वेळा वाढविल्या आहेत. पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व व्यापारी दुकाने रात्री 11 वाजेपर्यंत, तर हॉटेल, रेस्टॉरेंट, बार, फुड कोर्ट सर्व दिवस रात्री 12 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी काढले आहेत.
हेही वाचा - रिपब्लिकन पक्षाच्यावतीने विविध मागण्यांकरता पुण्यात आंदोलन
कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. तिसरी लाट आली नसल्याने रुगणसंख्येत घट झाली आहे. त्यामुळे, राज्य शासनाकडून निर्बंध शिथिल केले जात आहेत. आता दुकानांच्या वेळाही वाढविल्या आहेत. पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व व्यापारी आजपासून दुकाने रात्री 11 वाजेपर्यंत, तर हॉटेल, रेस्टॉरेंट, बार, फुड कोर्ट सर्व दिवस रात्री 12 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. महापालिका क्षेत्रातील अम्युझमेंट पार्क, संग्रहालय, इंडस्ट्रीज शुक्रवारपासून सुरू होतील. यामध्ये फक्त मोकळ्या जागेतील कोरड्या राईडसाठी परवानगी राहील, पाण्यातील राईडसाठी मनाई आहे. हे आदेश पुणे, खडकी कटक मंडळालाही लागू राहणार आहेत.
...असे आहे आदेश
१) पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यापारी दुकाने ही सर्व दिवस रात्री ११.०० वाजेपर्यंत सुरू राहतील.
२) पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व रेस्टॉरेंट, बार, फुड कोर्ट हे सर्व दिवस रात्री १२.०० वाजेपर्यंत सुरू राहतील.
३) पुणे महानगरपालिका क्षेत्रातील अम्युझमेंट पार्क, संग्रहालय व इंडस्ट्रीज दिनांक २२/१०/२०२१ पासून सुरू राहतील. तसेच, या आदेशाद्वारे फक्त मोकळ्या जागेतील कोरड्या राईड (d2/9s) साठी परवानगी राहील. मात्र, यामध्ये पाण्यातील राईडला (water rides) मनाई राहील.
४) महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग, यांचे अम्युझमेंट पार्क व इंडस्ट्रीज सुरू करण्याबाबतचे दिनांक १८.१०.२०२१ रोजीचे निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना (SOP) यासोबत संलग्न केलेले आहेत. तरी सदर आदेश / मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे.
५) सदर आदेश हे पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये येणाऱ्या पुणे कटक मंडळ व खडकी कटक मंडळ यांना देखील लागू राहतील.
६) संदर्भीय आदेशान्वये वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.
हेही वाचा - Pune Crime : चित्रपटात भूमिकेचं आमिष दाखवून अभिनेत्रीवर बलात्कार