ETV Bharat / city

Har Ghar Tiranga: मेट्रो सफरीत ३०० विद्यार्थ्यांनी केले देशभक्तीपर गीतांचे समूहगान, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मानवंदना - students sang patriotic songs in the Metro Safari

'झेंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा', 'ए वतन मेरे आबाद रहे तू, हम होंगे कामयाब'. अशा देशभक्तीपर गीतांचे पुणे मेट्रोमध्ये बसून सादरीकरण करीत ३०० विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आगळीवेगळी मानवंदना दिली. ( Har Ghar Tiranga ) हर घर तिरंगा या अभियानाला प्रतिसाद देत तिरंगी ध्वज हातात घेऊन भारत माता की जय, असा जयघोष करीत विद्यार्थ्यांनी मेट्रोची सफर केली आहे.

मेट्रो सफरीत ३०० विद्यार्थ्यांनी केले देशभक्तीपर गीतांचे समूहगान

author img

By

Published : Aug 7, 2022, 6:42 PM IST

पुणे - 'झेंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा', 'ए वतन मेरे आबाद रहे तू, हम होंगे कामयाब'. अशा देशभक्तीपर गीतांचे पुणे मेट्रोमध्ये बसून सादरीकरण करीत ३०० विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आगळीवेगळी मानवंदना दिली. हर घर तिरंगा या अभियानाला प्रतिसाद देत तिरंगी ध्वज हातात घेऊन भारत माता की जय, असा जयघोष करीत विद्यार्थ्यांनी मेट्रोची सफर केली आहे.

व्हिडिओ

मेट्रोत बसून देशभक्तीपर गीतांचे समूहगान - निमित्त होते, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस्, नऱ्हेमधील चार विभागांतील प्रत्येकी ७५ विद्यार्थी याप्रमाणे एकूण ३०० विद्यार्थ्यांसाठी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित मेट्रो सफरीचे. यावेळी जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस्चे उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर, पुणे मेट्रोचे मनोजकुमार डॅनियल, दीपक पिल्ले आदी उपस्थित होते. गरवारे मेट्रो स्टेशन ते वनाझ व परतीचा प्रवास करीत विद्यार्थ्यांनी मेट्रोत बसून देशभक्तीपर गीतांचे समूहगान केले.

सुविधा देणारी मेट्रो सर्वांनी मोठया प्रमाणात वापरावी- अ‍ॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, देशाच्या विकासात मेट्रोचे मोठे योगदान आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीतील मेट्रोचे महत्व विद्यार्थ्यांना समजावे आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात इन्स्टिटयूटमधील चार विभागांतील प्रत्येकी ७५ विद्यार्थी याप्रमाणे एकूण ३०० निवडक विद्यार्थ्यांना मेट्रोची सफर अनुभविता यावी, यासाठी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. पुण्यातील प्रदूषण कमी करण्यासोबतच अत्यंत आरामदायी प्रवासाची सुविधा देणारी मेट्रो सर्वांनी मोठया प्रमाणात वापरावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.

हेही वाचा - ऐकावं ते नवलचं, 'पोपट वारंवार शिट्टी मारतो, त्यामुळे...'; पुणेकराने केली पोलिसांत तक्रार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.