ETV Bharat / city

Ganeshotsav 2021 : 'या' वेळेला होणार पुण्यातील मानाच्या गणपतींचे विसर्जन

author img

By

Published : Sep 17, 2021, 8:46 PM IST

मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही मानाच्या गणपती मंडळांनी समाजहितासाठी उत्सव मंडपातच गणपती विसर्जन करायचा निर्णय घेतला आहे. परंपरेनुसार मानाचा पहिल्या कसबा गणपतीचे विसर्जन सकाळी ११ वाजता होणार आहे.

Manache Ganpati
पुण्यातील मानाचे गणपती

पुणे - मागील वर्षी कोरोनामुळे गणेशोत्सव सर्वांनीच साधेपणाने साजरा केला होता. तसेच नागरिकांना, भक्तांना ऑनलाईन माध्यमातून दर्शन व आरती घेण्याचे आवाहन केले होते. त्याला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्याचप्रमाणे यंदाही गणेशोत्सवात कोरोनाचे सावट आहे, अशा परिस्थितीत नागरिकांना काळजी घेऊन उत्सव साजरा करण्याचे आणि ऑनलाईन माध्यमांचा वापर करण्याचे आवाहन केले होते. मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही मानाच्या गणपती मंडळांनी समाजहितासाठी उत्सव मंडपातच गणपती विसर्जन करायचा निर्णय घेतला आहे. परंपरेनुसार मानाचा पहिल्या कसबा गणपतीचे विसर्जन सकाळी ११ वाजता होणार असून, त्यानंतर ४५ मिनिटांनंतर क्रमवारीनुसार इतर मानांच्या गणपतींचे विसर्जन होणार आहे.

हेही वाचा - Ganeshotsav 2021 : पुण्यातील मानाचे पाच गणपती आणि त्यांचा इतिहास!

  • या वेळेला होणार मानाच्या गणपतींचे विसर्जन -

मानाचा पहिला श्री कसबा गणपती ११ वाजता, मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी ११.४५ वाजता, मानाचा तिसरा गुरुजी तालीम १२.३०, मानाचा चौथा श्री तुळशीबाग १.१५ मिनिटांनी आणि मानाचा पाचवा केसरी वाडा २ वाजता, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती २.४५ मिनिटांनी विसर्जित होणार आहे.

अखिल मंडई मंडळाच्या गणरायाचे विसर्जन यंदा देखील मंदिर परिसरातच होणार आहे. १२८ वर्षाच्या उत्सवाच्या परंपरेत सलग दुसऱया वर्षी साधेपणानेच विसर्जन देखील करण्यात येणार आहे. फुलांनी सजवलेल्या अमृत कुंभात महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते गणरायाचे विसर्जन करण्यात येणार आहे. रविवारी (१९ सप्टेंबर) अनंत चतुर्दशीच्या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता गणरायाला निरोप देण्यात येईल.

  • विसर्जनाच्या दिवशी शहर आणि परिसरातील सर्व दुकाने बंद राहणार -

वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्यनगरीतील गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे पोलिसांकडून उत्सवासाठी नियमावली लागू करण्यात आली आहे. घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांनी खरेदीसाठी गर्दी करू नये, रस्ते, पदपथांवर मूर्ती विक्री स्टॉल लावू नयेत, तसेच प्रतिष्ठापना आणि विसर्जन सोहळ्यासाठी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांना यंदाही परवानगी देण्यात येणार नाही. गणपती विसर्जनाच्या दिवशी पुणे, पिंपरी चिंचवड आणि कॅन्टोनमेंट परिसरातली सर्व दुकाने बंद राहणार आहेत.

हेही वाचा - Ganeshotsav 2021 : जाणून घ्या, नवसाला पावणाऱ्या टेकडी गणेश मंदिराचा इतिहास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.