पुणे - राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीची लाट आलेली असतानाच आता पुन्हा हवामानात अचानक बदल होणार आहे. आजपासून पुढील 3 दिवस पुण्यात हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुढील 3 दिवस पुण्यात मेघगर्जनेसह पावसाची धुवाधार बॅटिंग होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात बहुतांशी ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार -
श्रीलंका आणि तामिळनाडू किनारपट्टी परिसरात हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यापासून राज्यात अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. गेल्या तीन दिवसांत कोल्हापूरसह दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. यानंतर आता अरबी समुद्रात देखील हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात बहुतांशी ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आठ जिल्ह्यांना येलो अलर्ट -
हवामान खात्याने उद्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर या आठ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, सांगली, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यांना 3 नोव्हेंबरला एलो अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यांना 4 नोव्हेंबर रोजी एलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच 5 आणि 6 नोव्हेंबर रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय 7 नोव्हेंबरला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली, सोलापूर जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
आजपासून पुढील 3 दिवस पुण्यात येलो अलर्ट; पुण्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता - IMD issues yellow alert
आजपासून पुढील 3 दिवस पुण्यात हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुढील 3 दिवस पुण्यात मेघगर्जनेसह पावसाची धुवाधार बॅटिंग होण्याची शक्यता आहे.