पुणे - राज्यात साखरेचे उत्पादन आणि साखराचे दर यावर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या उसाचा दर निश्चित होतो. राज्यातील साखरेचे दर वाढल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येणार आहेत. याविषयी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी माहिती दिली आहे.
सध्याचे असलेले साखरेचे दर येणाऱ्या पुढील काळात राहिले तर पुढील वर्षी शेतकऱ्यांना उसासाठी विक्रमी दर मिळणार मिळणार आहे. एफआरपीच्यावर जी रक्कम दिली जाते, त्याला आरएसएफ म्हटले जाते. आरएसएफ म्हणजे उपपदार्थांपासून मिळणारी रक्कम असते. शेतकऱ्यांना एफआरपीच्यावरच्या रक्कमेच्यापैकी 70 टक्के रक्कम ही शेतकऱ्याला मिळणार आहे. 30 टक्के रक्कम ही कारखानदाराला मिळणार आहे. आरएसएफ दर हा पूर्वी 8 ते 10 कारखान्यांचा निघत नव्हता. यावर्षी 30 ते 40 कारखान्यांचा आरएसएफ दर जास्त निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या साखरेच्या मागणी तसेच वाढलेल्या दराप्रमाणे पुढील वर्षीदेखील शेतकऱ्यांना विक्रमी रक्कम मिळणार असल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे.
हेही वाचा-दिवाळीमध्येच सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार झळ; 'हे' आहेत आजपासून नवीन नियम
यंदा 40 लाख टन साखर शिल्लक-
गेल्या 4 वर्षांच्या तुलनेत महाराष्ट्रातील साखरेची परिस्थिती खूपच चांगली आहे. गेली 4 वर्षे साखर तयार झाल्यानंतर ती सुमारे 2 वर्ष गोडाऊनमध्ये पडून राहत होती. साखरेचा बाजार भाव हा खूपच कमी होता. एफआरपीचा दर हा त्यापेक्षा जास्त होता. यावर्षी 2, 900 रुपये एफआरपी असली तरी खुल्या बाजारात साखरेचा दर हा 34 रुपये प्रति किलो आहे. त्याचा चांगला फायदा हा शेतकऱ्यांना होणार आहे. त्याच पद्धतीने या वर्षी एक बदल होत आहे. इथेनॉलकडे वाटचाल सुरू झाली आहे. त्याचा परिणाम राज्यात सकारात्मक होत आहे.
हेही वाचा-खूशखबर! ईपीएफवर वार्षिक व्याज 8.5 टक्के मिळणार; केंद्र सरकारकडून मंजुरी
मागील वर्षी 60 लाख टन साखर एवढी शिल्लक होती. ती यंदा 40 लाख टनाच्या खाली आहे. साखरेचा साठा शिल्लक राहणे, याचा अर्थ असा की जास्त वेळ ही साखर शिल्लक राहण्याची शक्यता कमी आहे. सुमारे 72 लाख टन साखर ही विदेशात निर्यात केली आहे. त्यामुळे भारताचा साठाही कमी झाला आहे. या सगळ्यांमुळे साखरेचा दर हा वाढत आहे. त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायदेशीर असा आहे. यावर्षी एफआरपीचे पैसे हे बहुतांश साखर कारखाने वेळेवर देऊ शकणार आहेत.
हेही वाचा-महागाईचे संकट: एलपीजीसह पेट्रोल-डिझेलचे दर पुढील आठवड्यात वाढण्याची शक्यता
वाढलेल्या दरामुळे साखर कारखान्यांकडून एफआरपी देण्यास सुरुवात
2 ते 3 वर्ष आर्थिक अडचणीत असलेल्या कारखान्यांनी 99 टक्के एफआरपी दिली आहे. 1 टक्के एफआरपीमध्ये 42 कारखाने हे अडकले आहेत. त्यांना आजही परवाना देऊ शकलेलो नाही. जोपर्यंत एफआरपी देत नाही, तोपर्यंत परवाना देण्यात येणार नाही. याचाच अर्थ असा की त्या त्या हंगामात उसाचे पैसे त्याच वेळेला मिळायला पाहिजे असा अजेंडा आम्ही पाळला आहे. त्याचा निश्चित परिणाम हा उसाचा क्षेत्र वाढण्यात झाल्याचे यावेळी गायकवाड म्हणाले. शेतकऱ्यांना वेळेवर एफआरपी मिळण्यास मदत होणार आहे. साखरेचे दर वाढवून 2 महिने झाले आहेत. मार्च अखेरीस 76 कारखान्यांनी एफआरपीचे पैसे दिलेले नव्हते. ते सगळे आता एफआरपी देत आहे. हे वाढलेल्या साखरेच्या दरामुळेच झाले आहे. यावर्षी साखरेचे दर असेच राहिले तर शेतकऱ्यांना वेळेवर एफआरपी मिळण्यास मदत होणार आहे, असेदेखील यावेळी गायकवाड म्हणाले.
यंदा 72 लाख टन साखर होणार निर्यात
साखरेची निर्यात ही मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. तर 72 लाख टन साखर ही निर्यात करण्यात आली आहे. सर्वात जास्त निर्यात ही इंडोनेशिया, युरोप कंट्री, दुबई अशा देशांना झाली आहे. 72 लाख टनातील जवळपास 40 लाख टनापेक्षा जास्त साखर ही इंडोनेशियामध्ये निर्यात झालेली आहे. यावर्षीदेखील अनुदान न देता 60 लाख टन निर्यात करणे शक्य होणार असल्याची माहिती आयुक्त गायकवाड यांनी दिली.
पुढील वर्षी 112 टन साखरेचे उत्पादन होणार
गतवर्षी 11.32 लाख हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड होती. यावर्षी ते 12.50 लाख हेक्टर झाले आहे. याचा परिणाम असा होईल की यावर्षी विक्रमी उत्पादन होणार आहे. साखरेच्या उत्पादनात इतिहासात प्रथमच 112 टन एवढे साखरेचे विक्रमी उत्पादन होणार आहे. तसेच 10 लाख टन साखर निर्यातीपासून वाचविणार आहे. तेवढ्याच इथेनॉल बनवण्यात येणार आहे. यंदा 125 कोटी लिटर इथेनॉल हे बनविण्यात येणार आहे. त्यातून दर 21 दिवसांनी साखर कारखान्यांना पैसे मिळणार आहे. तसेच यंदा एफआरपी शिल्लकदेखील राहणार नाही, असेदेखील यावेळी आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.