ETV Bharat / city

Ganeshotsav 2022 मूर्ती आमची किंमत तुमची उपक्रमाला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद - Maharaj Shri Seva Mandals Socially Useful Project

पिंपरी चिंचवड Pimpri Chinchwad Ganeshotsav मध्ये यंदाही श्री महाराज सेवा मंडळाच्या Shri Seva Mandals वतीने मूर्ती आमची किंमत तुमची हा अनोखा उपक्रम राबवला जात आहे. उपक्रमांतर्गत पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेश मूर्ती Shadu Clay Ganesha Idols भक्तांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तर या उपक्रमातून मिळालेला निधी वृध्दाश्रमालादेण्यात येणार आहे.

Idol Is Ours Price
मूर्ती आमची किंमत तुमची
author img

By

Published : Aug 29, 2022, 5:53 PM IST

पिंपरी चिंचवड Pimpri Chinchwad Ganeshotsav मध्ये यंदाही श्री महाराज सेवा मंडळाच्या Shri Seva Mandals वतीने मूर्ती आमची किंमत तुमची हा अनोखा उपक्रम राबवला जात आहे. उपक्रमांतर्गत पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेश मूर्ती Shadu Clay Ganesha Idols भक्तांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सेवा मंडळाने प्रामाणिक पणे मूर्तीला आलेला खर्च किती आला याची माहिती दिलेली आहे. भाविकांनी त्यांच्या इच्छेनुसार गणेशमूर्ती साठी किंमत द्यायची आहे. या उपक्रमातून मिळालेला निधी वृध्दाश्रमालादेण्यात येणार आहे.

मूर्ती आमची किंमत तुमची उपक्रमाला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद

वृद्धसेवा आणि निसर्गाच संगोपन पिंपरी चिंचवडमध्ये मूर्ती आमची किंमत तुमच्या हा उपक्रम गेली आठ वर्षे झालं राबवला जात आहे. परंतु, दोन वर्षे कोरोनाची गेल्याने याचा फटका या संस्थेला बसला आहे. श्री महाराज सेवा मंडळ वृद्धाश्रम देखील चालवत असून गणेश मूर्तींमधून मिळालेले पैसे वृद्धा च्या सेवेसाठी वापरले जातात. त्याच्या या उपक्रमात काही तरुण, तरुणी देखील जोडल्या गेल्या आहेत. स्वत झोकून त्या समाजसेवा करत असल्याचे पाहायला मिळत आहे. वृद्धसेवा आणि निसर्गाच संगोपन Aged Care and Nature Care अशा दोन गोष्टी सेवा मंडळ साध्य करत आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस च्या गणेश मूर्तींमुळे जलप्रदूषण होत अस वारंवार सांगण्यात येत, त्यामुळे जास्तीत नागरिकांनी शाडू मातीच्या मूर्तींवर भर द्यायला हवे असे आवाहन गणेश भक्त नेहमी करताना दिसतात. श्री महाराज सेवा मंडळाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या या उपक्रमाला गणेश भक्तांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे. गणेश मूर्तीच्या माध्यमातून आम्हाला सेवा करण्याची संधी मिळत असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

योग्य वाटेल तेवढी रक्कम द्या यावेळी, वृद्धाश्रमाचे संचालक डॉ. अविनाश वैद्य म्हणाले की, नदी, नाले, समुद्र हे प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मूर्तींमुळं दूषित होत आहेत. ते दूषित होऊ द्यायचे नाहीत. म्हणून, शाडूच्या मातीच्या गणेश मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. रंग देखील नैसर्गिक आहेत. आठ वर्षे पासून हा उपक्रम राबवला जातोय. प्रत्येक मूर्तीच्या खाली तीच निर्मिती मूल्य लिहिले आहे. तुम्हाला योग्य वाटेल तेवढी रक्कम द्या अस आम्ही ग्राहकांना सांगतो. आम्ही कोणालाही जबरदस्ती करत नाहीत. गुप्त पद्धतीने पैसे दिले जातात. या पैशांमधून वृद्धाश्रम चालवल जाते. देशासाठी शहिद झालेल्या जवानाच्या कुटुंबाला देखील आर्थिक हातभार लावत असतो. डॉ. अविनाश वैद्य यांनी सांगितले आहे.

हेही वाचा Video नाशिकच्या गणेशोत्सवासाठी इकोफ्रेंडली सजावट साहित्य बाजारात दाखल, किंमतीत 15 ते 24 टक्के वाढ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.