पुणे - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत ६५ कारखान्यांची यादी वाचून दाखवत कोणता कारखाना किती किमतीला विकला गेला याची आकडेवारी सांगितली. त्यावेळी हर्षवर्धन पाटील हे सहकार मंत्री होते. याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता मी सहकारमंत्री असताना सहकारी साखर कारखाने विकले गेले. पण सहकार मंत्री म्हणून माझी त्यामधे भूमिका नव्हती. मी कोणताही कारखाना विकला नाही. कारण कारखान्याची विक्री ही कर्ज देणारी बॅक किंवा महामंडळ करत असते. कुठल्या साखर कारखान्यांची विक्री करण्यात आलीय याची यादी माझ्याकडे आल्यावर मी यावर बोलेन असे माजी सहकार मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
मी कोणताही कारखाना विकला नाही : हर्षवर्धन पाटील - etv bharat news
ठाकरे सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यास हेक्टरी फक्त दहा हजारांपर्यंतची मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या नुकसानीचीही थट्टा केली. संकटकाळात शेतकऱ्याला भुलवून खोटी आश्वासने देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी याचा जवाब द्यायला हवा, असे माजी सहकार मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.