पुणे - कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात शाळा बंद करण्यात आल्या होत्या. पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले. अशा काळातही खासगी शाळांनी शुल्कात (फी) वाढ केली आहे. याचा विरोध करण्यासाठी महापॅरेंट्स संघटनेच्यावतीने बालगंधर्व रंगमंदिराबाहेर मानवी साखळी करून आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा - वाफ घेतल्याने कोरोना होत नसल्याची अफवा; उकळते पाणी सांडल्याने दोन चिमुरडे भाजले
खासगी शाळांकडून लॉकडाऊनच्या काळातही शाळा बंद असताना अवाजवी शुल्कवाढ करण्यात आली आहे. या काळात छोट्या व्यवसायापासून ते सर्व उद्योग बंद होते. हे ध्यानी घेता, शाळा बंद असतानाही खासगी शाळांकडून शुल्कवाढ करणे, हे चुकीचे असल्याचे सांगून याचा निषेध म्हणून महापॅरेंट्स संघटनेतर्फे मानवी साखळी करण्यात आली.
खासगी शिक्षण संस्थानी विविध खर्चापोटी पालकांकडून शुल्क आकारले. तसेच, शुल्क न भरल्यास पाल्याचे ऑनलाइन वर्ग बंद केले जात आहेत. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अशा मनमानी पद्धतीने शुल्क वसूल करणाऱ्या संस्थांविरोधात शासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी पालकांनी यावेळी केली आहे.
हेही वाचा - रिया चक्रवर्ती 'या' सेना नेत्याच्या संपर्कात असल्याचा सुशांतच्या मित्राचा दावा