ETV Bharat / city

राज्यभरातील होमगार्ड आक्रमक, विविध मागण्यांसाठी पुण्यात आंदोलन

author img

By

Published : Aug 6, 2021, 3:34 PM IST

राज्यभरातील होमगार्ड आक्रमक झाले असून विविध मागण्यांसाठी बसव प्रतिष्ठानच्यावतीने पुणे ते मुंबई पायी मोर्चा आज पुण्यातून काढण्यात येणार होता. या पायी मोर्च्यासाठी राज्यभरातील मोठ्या संख्येने होमगार्ड एकत्र देखील आले होते. मात्र पायी मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर राज्यातील होमगार्डच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरच ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे.

राज्यभरातील होमगार्ड आक्रमक.
राज्यभरातील होमगार्ड आक्रमक.

पुणे - राज्यभरातील होमगार्ड आक्रमक झाले असून विविध मागण्यांसाठी बसव प्रतिष्ठानच्यावतीने पुणे ते मुंबई पायी मोर्चा आज पुण्यातून काढण्यात येणार होता. या पायी मोर्च्यासाठी राज्यभरातील मोठ्या संख्येने होमगार्ड एकत्र देखील आले होते. मात्र पायी मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर राज्यातील होमगार्डच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरच ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे.

राज्यभरातील होमगार्ड आक्रमक, विविध मागण्यांसाठी पुण्यात आंदोलन

काय आहे मागण्या?
जाचक अटी लावून विविध कारणांनी अपात्र होमगार्ड यांना त्वरित विनाअट कामावर रुजू करून घ्यावे. होमगार्डना कायमस्वरूपी 365 दिवस कामावर घ्यावे. बंदोबस्त मानधन आठवड्याभरात द्यावे. पोलीस खात्यातील 5 टक्के आरक्षण 15 टक्के करण्यात यावे. तीन वर्षांनी होणारी पुनरनोंदणी/पुनर्नियुक्ती पद्धत बंद करावे. जिल्हा समादेशक पद पूर्ववत ठेवावे. आंदोलकांवरील झालेली कार्यवाही त्वरित थांबवण्यात यावी. वय वर्ष 50 वरील होमगार्ड यांचे काम त्वरित सुरू करण्यात यावे. अशा विविध मागण्या यावेळी होमगार्ड यांच्याकडून करण्यात आल्या आहे.

...अन्यथा तीव्र आंदोलन
वारंवार गृहमंत्री, गृहराज्यमंत्री तसेच स्थानिक प्रशासन यांना निवेदन देऊनही मागण्या मान्य होत नाही. अनेक होमगार्डवर अन्याय करून त्यांना सेवेपासून वंचित ठेवण्यात येत आहे. जाचक अटी लावून होमगार्डना काढून टाकण्यात येत आहे. आज जरी पोलिसांनी पायी मोर्चाला परवानगी नाकारली असली तरी आम्ही पायी मोर्चा काढण्यावर ठाम आहे. जिल्हाधिकारी यांच्याशी पायी मोर्च्यासाठी चर्चा करण्यात येणार आहे. लवकरात लवकर मागण्या मान्य नाही झाल्या तर येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी बसव प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामलिंग पुराने यांनी दिला आहे.

'प्रशासनाला मान्य आहे की अन्याय झाला आहे मग अडलंय कुठे?'
मी सन 1999 साली होमगार्ड म्हणून काम करायला सुरुवात केली आणि त्यानंतर तालुका समादेशक म्हणून 2011 सालापासून काम करत असताना कार्यालयीन आदेशानुसार उजेळणी प्रशिक्षण झाली असताना अचानकपणे 2019 साली सेवा समाप्तीचे पत्र आले. त्यानंतर मी वारंवार जिल्हा समादेशक, महासमादेशक, गृहमंत्री, गृहराज्यमंत्री यांना पत्रव्यवहार करूनही माझ्यावर झालेल्या अन्यायाला काहीच बोलत नाही. प्रशासन हे मान्य करत आहे की माझ्यावर अन्याय झाला आहे. पण कोरोनाचे कारण देत महासमादेशक कार्यालयाकडून पत्र येत नाही, असे सांगितले जात आहे. आता असे असताना आम्ही काय करायचे. माझ्या सारख्या अनेक माझ्या होमगार्ड बांधवांवर देखील अशाच पद्धतीने अन्याय झाला आहे. शासनाने याची दखल घेत आम्हा होमगार्डना पुन्हा सेवेवर रुजू करावे. अशी मागणी यावेळी माजी जिल्हा समादेशक मुराद अब्बास सय्यद यांनी केली आहे.

हेही वाचा - महाराष्ट्राचा नेता होण्यासाठी राज यांनी व्यापक भूमिका घ्यावी; भेटीनंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.