पुणे - गणपतराव देशमुख यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत 50 वर्षापेक्षा जास्त नेतृत्व केलं आहे. ते करत असताना दुष्काळी भागातील नागरिकांचे प्रश्न, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न हे नेहेमी मांडण्याचं प्रयत्न गणपतराव देशमुख यांनी केलं आहे. अतिशय विद्वान, अतिशय संयमी, शांत अशी भूमिका त्यांची नेहमीच राहिली आहे. साधेपणाने राहणे आणि कोणाकडेही जाणं ही त्याची खासियत राहिलेली आहे. मला गणपतराव देशमुख यांच्याबरोबर 25 वर्षांपेक्षा जास्त काम करायला मिळालं. काही दिवस तर आम्ही दोघंही एकाच बेंचवर त्यांच्याबरोबर बसत होतो. त्याच्या शिकवणीचा खूप मोठा फायदा आम्हा सर्वांना झाला आहे. गणपतराव देशमुख यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे, जी कधीच भरून निघणार नाही, अशी भावना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली.
डीसीपींच्या ऑडियो क्लिप संदर्भात डिसीपी यांनी जी काही माहिती काल समाजमाध्यमामध्ये दिली आहे. ती अतिशय गंभीर असून पोलीस आयुक्तांना मी सूचना दिल्या आहेत कि या प्रकरणात दोन्ही बाजूने तपास व्हायला हवा. त्याचा अहवाल सादर झाल्यानंतर याबाबतची भूमिका राज्य सरकार घेईल असंही यावेळी वळसे पाटील यांनी सांगितले.