ETV Bharat / city

Rahul Bajaj : देशाच्या उभारणीमध्ये बजाज कुटुंबाचे महत्वाचे योगदान - गृहमंत्री

देशाच्या उभारणीमध्ये बजाज कुटुंबाचे महत्वाचे योगदान होते. राहुल बजाज हे स्पष्ट वक्ते होते, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी दिली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, आदित्य ठाकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि रघुनाथ माशेळकर यांनी बजाज यांच्या पार्थिवाच अंत्यदर्शन घेतले.

दिलीप वळसे-पाटील
दिलीप वळसे-पाटील
author img

By

Published : Feb 13, 2022, 8:21 PM IST

Updated : Feb 13, 2022, 8:42 PM IST

पिंपरी चिंचवड - देशाचे हमारे बजाज म्हणून नावाजलेले उद्योजक राहुल बजाज यांचे निधन झाले असून ते अनंतात विलीन झाले आहेत. त्यांच्या जाण्याने देशाचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे. देशाच्या उभारणीमध्ये बजाज कुटुंबाचे महत्वाचे योगदान होते. राहुल बजाज हे स्पष्ट वक्ते होते, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी दिली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, आदित्य ठाकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि रघुनाथ माशेळकर यांनी बजाज यांच्या पार्थिवाच अंत्यदर्शन घेतले. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

श्रद्धांजलीनंतर प्रतिक्रिया देताना मंत्री

औद्योगिक क्षेत्रातील सकारात्मक विचार करणार नेतृत्व आज हरपलेले आहे. बजाज परिवाराचा इतिहास स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू झाला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा या देशाच्या उभारणीमध्ये बजाज कुटुंबाचे महत्वाचे योगदान राहील आहे. राहुल बजाज हे स्पष्ट वक्ते होते, असे दिलीप वळसे पाटील म्हणाले आहेत. राहुल बजाज हे दिलदार व्यक्तिमत्त्व होते. हमारे बजाजच्या माध्यमातून ते नेहमी स्मरणार्थ राहतील, असे रघुनाथ माशेलकर म्हणालेत. तर, राजकीय नेत्यांना ते तोंडावर बोलायचे. सामाजिक प्रश्नांची त्यांना जाण असणारे बजाज होते. तरुण उद्योजकांनी त्यांच्याकडे आयकॉन म्हणून पाहिले पाहिजे, असे छगन भुजबळ म्हणाले.

हेही वाचा - उद्योगपती राहुल बजाज अनंतात विलीन, शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार

Last Updated : Feb 13, 2022, 8:42 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.