ETV Bharat / city

राज्यात पुढील दोन दिवस जोरदार पावसाची हजेरी - वाचा, हवामान खात्याचा अंदाज - Torrential in the state

राज्यात आजपासून पुढील दोन दिवस ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात पुढील दोन दिवसानंतर पावसाचा जोर कमी होत जाईल. तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Heavy rains in the next two days in the state - read, weather department forecast
राज्यात पुढील दोन दिवस जोरदार पावसाची हजेरी - वाचा, हवामान खात्याचा अंदाज
author img

By

Published : Oct 9, 2021, 7:17 PM IST

पुणे - राज्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावलेली असून मराठवाड्य़ात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. तर मध्य महाराष्ट्र, कोकणासह विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला. तर पुढील दोन दिवस बहुतांश ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या पुणे खात्याने वर्तवली आहे.

  • हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा -

राज्यात आजपासून पुढील दोन दिवस ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात पुढील दोन दिवसानंतर पावसाचा जोर कमी होत जाईल. तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

  • कोकणात चार दिवस मुसळधार -

राज्यात दि. 10 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर दरम्यान कोकण विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर या दिवशी काही भागात रिपरिप पाऊस असेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवली आहे. तर 13 ऑक्टोबर रोजी काही ठिकाणी साधारण पाऊस पडण्याची शक्यता आहे.

  • मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस विजांच्या कडकडाटात -

पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. तर 13 ऑक्टोबर रोजी काही ठिकाणी साधारण पाऊस पडण्याची शक्यता आहे.

  • मराठवाड्यात 10 ऑक्टोबर रोजी विजांच्या कडकडाटसह पाऊस -

मराठवाड्यात 10 ऑक्टोबर रोजी काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो तर बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर 13 रोजी हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

  • विदर्भात तुरळक ठिकाणी रिपरिप -

विदर्भात 10 ऑक्टोबर रोजी तुरळक रिपरिप पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर 12 आणि 13 ऑक्टोबर रोजी हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - मुसळधार पावसामुळे राज्यातील ८२ टक्के धरणे भरली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.