ETV Bharat / city

Haryana Police in Pune : सौरव महाकाल आणि संतोष जाधव यांच्या चौकशीसाठी हरियाणा पोलीस पुण्यात

अभिनेता सलमान खान धमकी प्रकरणात ( Salman Khan threatening ) सौरव महाकाल याला याची माहिती 7 दिवसाआधीच होती. आणि त्याबाबत त्याचा तपास करण्यासाठी मुंबई पोलीस, पंजाब पोलीस यांनी सौरव महाकाल याची चौकशी केली आहे. आता हरियाणा पोलिसांनी देखील हरियाणा येथील गुन्ह्यांबाबत चौकशी करण्यासाठी सौरव महाकाल याची चौकशी केली आहे. ( Haryana Police in Pune )

Haryana Police in Pune
हरियाणा पोलीस पुण्यात
author img

By

Published : Jun 13, 2022, 3:32 PM IST

पुणे - सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात ( sidhu moosewala murder case ) पुण्यातील संशयित आरोपी संतोष जाधव याला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. तीन दिवसाआधी त्याचा सहकारी सौरव महाकाल याला अटक करण्यात आली होती. अभिनेता सलमान खान धमकी प्रकरणात ( Salman Khan threatening ) सौरव महाकाल याला याची माहिती 7 दिवसाआधीच ( Saurabh Mahakal connection with Salman Khan ) होती. आणि त्याबाबत त्याचा तपास करण्यासाठी मुंबई पोलीस, पंजाब पोलीस यांनी सौरव महाकाल याची चौकशी केली आहे. आता हरियाणा पोलिसांनी देखील हरियाणा येथील गुन्ह्यांबाबत चौकशी करण्यासाठी सौरव महाकाल याची चौकशी केली आहे.

महाकालनंतर जाधव करणार चौकशी - हरियाणा पोलिसांचा पथक रविवारीच पुण्यात दाखल झाला होता. त्यांनी काल पुण्यात येऊन सौरव महाकाल याची चौकशी केली. मध्यरात्री संतोष जाधव याला देखील अटक करण्यात आल्याने हरियाणा येथील विविध गुन्ह्यांमध्ये संतोष आणि सौरव याचा काही संबंध आहे का, याबाबत हरियाणा पोलीस हे संतोष जाधव याची चौकशी करणार आहेत.

शार्प शूटर संतोष जाधव सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील आरोपी - सुप्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांडात पुणे कनेक्शन असल्याचे पुढे आल्यानंतर राज्यात प्रचंड खळबळ उडाली होती. पुण्यातील सौरव महाकाल आणि संतोष जाधव या दोन कुख्यात आरोपीचा सिद्धूच्या हत्याकांडात सहभाग असल्याने पंजाब पोलीस त्यांच्या मागावर होते. दुसरीकडे पुण्यात घडलेल्या हत्याकांडाच्या घटनेतही पुणे ग्राणीण पोलीस सौरव महाकाल आणि संतोष जाधव या दोघांच्या मागावर होते. सिद्धू मुसेवाला हत्याकांडात या दोघांची नावे आल्याने हे पुण्यात सक्रिय असल्याचे उघड झाले. त्यानंतर पुणे पोलिसांनी आधी सौरव महाकालच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर संतोष जाधव याला पुणे ग्रामीण पोलिसांनी त्याचा मित्र नवनाथ सूर्यवंशी यांच्या माध्यमातून मोजे नागोरे ता मांडवी जि भुज गुजरात येथून झोपलेल्या अवस्थेत अटक केली आहे.

हेही वाचा - Santosh Jadhav Arrest : संतोष जाधव अटक प्रकरणी एडीजी कुलवंत सरंगल यांची पत्रकार परिषद, म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.