पुणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरून महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली. यावर राज्याचे राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर टिका केली असून ते म्हणाले की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात फरक आहे. जसे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे तीन ऋतू असतात. तसे राज ठाकरे यांचे ऋतू प्रमाणे आहे. राज ठाकरे यांनी जेव्हा मनसे सुरू केली त्याआधी मराठी मुद्द्यावर लढले. मग पक्षाची स्थापना केली आणि हम सब भाई आहे असे सांगितले. आता काय हातच लागत नाही म्हणून परत ते हिंदुत्वाकडे आले. राज ठाकरे हे सिझनेबल कार्यक्रम आहे. कोणत्याही ऋतूत यांना काहीच मिळत नाही अशी बोचरी टिका यावेळी गुलाबराव पाटील यांनी ( Gulabrao Patil On Raj Thackeray ) केली.
पाणी पुरवठा राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांबाबत आढावा बैठक ( Review meeting on water supply schemes ) आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते. 5 कोटींच्यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण करण करून स्कीम केल्या जात आहे. बाकीच्या ज्या काही योजना आहे, त्या जिल्हा परिषदेकडून केल्या जात आहे. त्याचा आढावा घेण्यात येणार आहे. देशात आणि राज्यात प्रत्येक गावात पाणी मिळावे यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्यावतीने जलजीवन मिशन ही योजना सुरू करण्यात आली आहे. राज्यातील 27 हजार गावात सर्वत्र या योजनेअंतर्गत पाणी द्यायचं आहे. त्याची सुरवात आजपासून होत आहे, असे यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले.
बोलणे सोपं आहे करणे कठीण आहे - हनुमान चालीसावर प्रश्न विचारलं असता ते म्हणाले की हनुमान चालीसा लावली पाहिजे कोणाची मनाई आहे. भोंगा उतारा म्हणणारा कोण आपला बाप.. बाळासाहेब ठाकरे हे आहे. त्याकाळी कोणाची हिंमत झाली नाही. पाहिले आम्ही पिक्चर काढले हे सेकंड पिक्चर आहे. मागच्या वेळेला ही राज ठाकरे यांनी असे अनेक वेळा विधान केलं आहे. उतरले का भोंगे...बोलणे सोपं आहे करणे कठीण आहे असा टोला देखील यावेळी पाटील यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.
हनुमान चालीसा लावा - देशभरात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होताना दिसत आहे. यावर पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की हनुमान चालीसा लावू असा टोला यावेळी पाटील यांनी लगावला.
हेही वाचा - Aborted After Watching Video : युट्यूब वर व्हिडीओ पाहून अल्पवयीन तरूणीने केले स्वतःचे अबॉर्शन