सोलापूर - शहरात रविवारी ( दि. 17 एप्रिल ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकी काढण्यात आल्या आहेत. बुद्ध दर्शन मंडळाच्या मिरवणुकीत सोलापूर शहर उत्तरचे विद्यमान भाजप तथा माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख ( Former Guardian Minister Vijaykumar Deshmukh ) यांनी मिरवणुकीत गाण्याच्या तालावर ठेका धरला. विद्यमान पालकमंत्री दत्तात्रय भरणे ( Guardian Minister Dattatray Bharane ) हे दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास सोलापुरातील प्रबुद्ध भारत या मंडळाच्या मिरवणुकीत आले आणि डॉल्बीवर ठेका धरला.आजी व माजी पालकमत्र्यांनी बेधुंद होऊन डॉल्बीच्या आवाजावर नृत्य करत आनंद लुटला.
डॉल्बीच्या आवाजावर पोलिसांची करडी नजर - सोलापुरात आज मोठ्या उत्साहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणूक निघालेल्या आहेत. दरम्यान, सोलापूर पोलीस आयुक्तालयाने मिरवणुकीमध्ये डॉल्बीच्या आवाजावर निर्बंध घातलेले आहेत. तरीही आमदार देशमुख, पालकमंत्री भरणे हे डॉल्बीच्याच तालावर ठेका धरल्याचे पहायला मिळाले. पण, सोलापूर पोलीस डॉल्बी वाजवणाऱ्या मंडळांवर नजर ठेवून आहेत. कायदेशीर व दंडात्मक कारवाईसाठी जागोजागी पोलीस तैनात केले आहेत.
हेही वाचा - Bhimsainik Stop Slogan Near Mosque : मशिदीवरील भोंग्याचा सोलापुरात आदर; अजान सुरू असताना घोषणाबाजी बंद