ETV Bharat / city

सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राच्या कामगिरीत पुण्याचेही आहे योगदान..! - सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राचे पुण्यात प्रशिक्षण

भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने ऐतिहासिक कामगिरी करताना अ‍ॅथलेटिक्समधील भारताचा पदकाचा दुष्काळ संपवला. भालाफेकच्या अंतिम फेरीत त्याने सुवर्ण पदक जिंकले. त्याच्या या विजयात पुण्याचा देखील मोठा वाटा आहे. कारण सुभेदार नीरज चोप्रा याने पुण्यातील आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षण घेतले आहे.

Gold medalist Neeraj Chopra
Gold medalist Neeraj Chopra
author img

By

Published : Aug 7, 2021, 11:36 PM IST

पुणे - भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने ऐतिहासिक कामगिरी करताना अ‍ॅथलेटिक्समधील भारताचा पदकाचा दुष्काळ संपवला. भालाफेकच्या अंतिम फेरीत त्याने सुवर्ण पदक जिंकले. त्याच्या या विजयात पुण्याचा देखील मोठा वाटा आहे. कारण सुभेदार नीरज चोप्रा याने पुण्यातील आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षण घेतले आहे.

निरज चोप्रा हे भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडचे सुभेदार आहेत. आज ऑलिम्पिक स्पर्धेत 87.58 मीटर भालाफेक करत, ट्रॅक अँड फिल्ड सुवर्णपदक जिंकत त्यांनी नवा इतिहास रचला आहे. नीरज चोप्रा यांनी आपले प्रशिक्षण पुण्याच्या आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूटमध्ये घेतले आहे.

Gold medalist Neeraj Chopra
सुभेदार नीरज चोप्रा
सुभेदार नीरज मूळचे हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातल्या खांदरा गावातल्या शेतकरी कुटुंबातले आहेत. 26 ऑगस्ट 2016 साली, नायब सुभेदार पदावर भारतीय लष्करात ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर म्हणून ते रुजू झाले. नीरजला 2018 साली अर्जुन पुरस्कार आणि 2021 साली त्यांच्या नेत्रदीपक कामगिरीसाठी विशिष्ट सेवा पदकाने गौरवण्यात आले आहे. त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल तसेच भारतीय लष्कर आणि संपूर्ण देशाचा गौरव वाढवल्याबद्दल, दक्षिण कमांडचे प्रमुख, लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन यांनी अभिनंदन केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.