पुणे:- नाना पेठ येथील क्वाटरगेट जवळ एका गोडाऊनला आग लागल्याची घटना मध्यरात्री 1 वाजल्याच्या सुमारास घडली आहे.या आगीत 4 जण किरकोळ जखमी झाले आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. तपासाअंती आगीचे नेमके कारण कळू शकेल. मात्र आग लागल्याने आसपासच्या लोकांची धावपळ झाली. सुरुवातीला लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. नंतर अग्निशामक जवानांना बोलावण्यात आले.
आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या 10 फायरगाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.स्पेअर पार्ट, स्पंज, लाकडी सामानचं गोडाऊन असल्याने आग मोठ्या प्रमाणात होती. एका व्यक्तीचा हात व पाय भाजला असल्याने त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं होतं. या आगीत अग्निशमन दलातील 2 जवान देखील किरकोळ जखमी झाले.आग विझवण्यात आली आहे. आगीचे कारण अजूनही समजू शकलले नाही.
नाना पेठ येथे गोडाऊनला आग, 4 जण किरकोळ जखमी - 4 injured in Pune fire
क्वाटरगेट जवळ एका गोडाऊनला आग लागल्याची घटना मध्यरात्री 1 वाजल्याच्या सुमारास घडली आहे.या आगीत 4 जण किरकोळ जखमी झाले आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.