ETV Bharat / city

Etv Bharat Special - वाचा... गावातील पहिल्या पदव्युत्तर मुलीचा संघर्ष - FIRST POSTGRADUATE girl

वेल्हे तालुक्यातील पासली गावातील मंगल वामन तुपे हिने गावात पहिली पदवीधर युवती होण्याचा मान मिळविला आहे.गावात जाण्यासाठी अद्यापही रस्ते नसणाऱ्या पासली गावातील ही मुलगी ही गावातील पहिली पदवयुत्तर घेणारी ठरली आहे.

FIRST POSTGRADUATE girl
FIRST POSTGRADUATE girl
author img

By

Published : Dec 4, 2021, 5:49 PM IST

पुणे - खेळायच्या वयात ती चालत १० ते १२ किमी अंतर शाळेत जात होती. माध्यमिक शिक्षणासाठी हे अंतर आणखी वाढलं.पण रात्री दुखरे पाय पोटाशी धरत ती झोपी जायची पण, तरीही शिक्षणाची कास तिने सोडली नाही. ही गोष्वेट आहे वेल्हे तालुक्याच्या दूर्गम भागात राहणाऱ्या मंगल तुपे हिची. तिने गावातील पहिली पदवीधर युवती होण्याचा सन्मान पटकावला आहे.

गावातील मुलीचा संघर्ष
गावातील पहिली पदवीधर युवती आजही शिक्षणाचे महत्त्व जरी वाढले असले तरी ग्रामीण भागात मात्र मुलींना दहावीनंतर शिक्षण बंद केला जातो हे वारंवार अनेक घटनांमधून पाहयला मिळते. तसेच ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षण जरी असलं तरी माध्यमिक शिक्षणासाठी शहराकडे वाटचाल करावीच लागते. त्यात जर मुलगी असल्यास अनेक वेळा घरचे लोक विचार करत असतात. शहरात आज पदवीपर्यंतचं शिक्षण कदाचित फार मोठे नसलेही...पण आजही मोबाईलसाठीही 'नॉट रिचेबल' असलेल्या गावात पदवीधरला खूप महत्त्व आहे. वेल्हे तालुक्यातील पासली गावातील मंगल वामन तुपे हिने गावात पहिली पदवीधर युवती होण्याचा मान मिळविला आहे.गावात जाण्यासाठी अद्यापही रस्ते नसणाऱ्या पासली गावातील ही मुलगी ही गावातील पहिली पदवयुत्तर घेणारी ठरली आहे. समाजाचा विरोध असताना केवळ आई वडिलांच्या भक्कम पाठींब्यामुळेच हे शिक्षण पूर्ण करता आल्याचे ती कृतज्ञतेने सांगते.
FIRST POSTGRADUATE girl
मंगल तुपे
गावातील मुलींंसाठी आदर्शप्राथमिक शिक्षण गावात घेतल्यांनंतर मंगल २०१३ मध्ये दहावीनंतर घराबाहेर पडली. शाळेत जाण्यासाठी १० ते १२ किलोमीटर चालत ती पुढे जातच राहिली. शिक्षण हेच ध्येय आणि तेच स्वप्न. उच्च माध्यमिक शिक्षण वेल्हे येथील तोरणा विद्यालयात घेतले तर पदवीचे शिक्षण अमृतेश्वर महाविद्यालय वाणिज्य शाखेतून विंझर येथे पूर्ण केले. एमएसडब्ल्यू पदव्युत्तर शिक्षण पुण्यातील कर्वे समाज शिक्षण संस्थेमध्ये २०२१ मध्ये पूर्ण केले.वेल्ह्याची ज्ञान प्रबोधनी आणि त्या संस्थेच्या सुवर्णा गोखले यांचे बहुमोल सहकार्य तिला मिळाले. मंगल सध्या समाजकार्यातील पदव्युत्तर शिक्षण घेत नोकरी करून स्वतः च्या पायावर उभी राहिली आहे.
FIRST POSTGRADUATE girl
महिलांचे देते शिक्षणाचे धडे

गावातील मुलांना शिक्षणाचे महत्व सांगते
मंगल आज मात्र वेळात वेळ काढून गावातील चिल्ल्या पिल्ल्यांना गोळा करत त्यांना शिकण्याचे महत्त्व समजावून देत असते. त्यांची मंगलताई वेळप्रसंगी त्यांच्या आई वडीलांची समजूत काढून त्यांचे शिक्षण अखंडीत रहावे यासाठी पदरमोडही करते म्हणून शिक्षणाचे मंगलगीत फारच प्रभावी ठरत आहे. अनेक मुली आज शिक्षण घेत नाहीये. घरच्या अनेक अडचणी असताना देखील परिस्थितीवर मात करून शिक्षणाचे महत्त्व समजावून देण्याचा प्रयत्न आज मंगल गावात करत आहे.घरात काम करून माझी मुलगी हि शिक्षण घेत होती.आज आज आम्ही अडाणी आहे. पण, आमची मुले अडाणी राहू नये म्हणून मी तिला शिक्षणात मदत केली असेही यावेळी मंगलची आई लीलाबाई वामन तुपे यांनी सांगितलं.
हेही वाचा - divorce due to wife bath : पत्नीच्या सहा वेळा होणाऱ्या अंघोळीने पती हैराण; घटस्फोटाकरिता न्यायालयात धाव

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.