ETV Bharat / city

Girl Number Viral on Social Media : मुलीचा नंबर Whats App ग्रुपवर कॉल गर्ल म्हणून केला व्हायरल अन्... - पुण्यात मुलीचा नंबर कॉल गर्ल म्हणून व्हायरल

मुलीचा नंबर Whats App ग्रुप बनवत त्यावर कॉल गर्ल (Call Girl) म्हणून व्हायरल (Viral) करण्यात आला होता. याप्रकरणी युवकाविरोधात पुण्यातील विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

vimantal police
विमानतळ पोलीस
author img

By

Published : Jan 8, 2022, 6:07 AM IST

पुणे - ओळख झालेल्या मुलीचा नंबर Whats App ग्रुप बनवत त्यावर कॉल गर्ल (Call Girl) म्हणून व्हायरल (Viral) करण्यात आला होता. याप्रकरणी युवकाविरोधात पुण्यातील विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - Auto Driver Rape Minor Girl : पुण्यात भाडे देण्यासाठी पैसे नसल्याने रिक्षाचालकाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

  • काय आहे प्रकरण

मागील सहा महिन्यांपासून हे सर्व प्रकरण सुरू आहे. आरोपीची या मुलीशी ओळख त्याच्याच एका मित्राने करून दिली होती. त्यानंतर आरोपीने त्या मुलीचा नंबर मिळवला. लोहगाव येथे राहणारी ही मुलगी असून, ती विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत कामाला आहे.

आरोपी काही दिवस तिच्याशी व्यवस्थित बोलत होता. नंतर त्याने मात्र अश्लील बोलायला सुरूवात केली. तसेच सोबत राहण्यासाठी तिला त्रास देऊ लागला. अनेकवेळा या मुलीने त्याला टाळायचा प्रयत्न केला. याच रागातून आरोपीने या Whats App वर 'काढा घोडा आणि करा राडा' या नावाने ग्रुप सुरू केला आणि या मुलीचा नंबर कॉल गर्ल् महणून त्या ग्रुपवर व्हायरल केला. नंतर त्या मुलीला अनेक कॉल येऊ लागले आणि हे सर्व प्रकरण तिच्या लक्षात आले. त्यानंतर तिने लगेच विमानतळ पोलिसात तक्रार दाखल केली.

  • आरोपीविरोधात गुन्हा दाखल -

दरम्यान, आरोपीविरोधात 354 ड अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. तसेच पुढील तपास सुरू असल्याची माहिती तपास अधिकारी आणि विमानतळ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक ऐम. बी. जोगण यांनी दिली आहे.

हेही वाचा - सहा वर्षीय मुलाची गळा दाबून हत्या करून पित्याची आत्महत्या; जळगाव जिल्ह्यातील धक्कादायक घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.