ETV Bharat / city

..तर दुकाने 7 पर्यंत सुरु करू, पुणे व्यापारी महासंघाचा सरकारला इशारा

दुसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत ५ एप्रिलपासून राज्य सरकारने पुणे शहरात जीवनावश्यक वस्तूंखेरीज बाजारपेठेतील बाकी सर्व व्यवसायांवर वेळेची बंधने आणली. मात्र आता चार महिने उलटून गेले तरीही यामध्ये अपेक्षेप्रमाणे शिथिलता आलेली नाही. एकीकडे शहरातील कोरोना रुग्णसंख्या कमी होत असताना हे निर्बंध लादले जात असल्याने व्यापारी वर्गामध्ये प्रचंड असंतोष आहे.

Pune Chamber of Commerce
Pune Chamber of Commerce
author img

By

Published : Aug 1, 2021, 5:34 PM IST

Updated : Aug 1, 2021, 5:43 PM IST

पुणे - दुसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत ५ एप्रिलपासून राज्य सरकारने पुणे शहरात जीवनावश्यक वस्तूंखेरीज बाजारपेठेतील बाकी सर्व व्यवसायांवर वेळेची बंधने आणली. मात्र आता चार महिने उलटून गेले तरीही यामध्ये अपेक्षेप्रमाणे शिथिलता आलेली नाही. एकीकडे शहरातील कोरोना रुग्णसंख्या कमी होत असताना हे निर्बंध लादले जात असल्याने व्यापारी वर्गामध्ये प्रचंड असंतोष आहे. याच पार्श्वभूमीवर झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करीत व्यापारी वर्गाला योग्य न्याय मिळावा, यासाठी येत्या मंगळवार ३ ऑगस्ट रोजी पुणे शहरातील सर्व व्यापारी विविध ठिकाणी घंटानाद आंदोलन करणार आहेत, अशी माहिती पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी दिली.

अन्यथा दुकाने 7 वाजेपर्यंत सुरू ठेवणार -

या आंदोलनानंतर सरकारने दुकानांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात योग्य निर्णय घेतला नाही, तर बुधवार ४ ऑगस्टपासून पुणे शहरातील सर्व दुकाने सायं. ७ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यात येतील, अशा इशारा महासंघाच्या वतीने देण्यात आला आहे. महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडल्यानंतर सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे व्यापारी महासंघाचा सरकारला इशारा
सरकारने व्यापाऱ्यांना निराश केले -
कोरोनाच्या पहिल्या लाटेत संपूर्ण देश लॉकडाऊन असताना सर्वच व्यवसाय डबघाईला आले. या परिस्थितीने आलेल्या नैराश्याने अनेकांनी आत्महत्या देखील केल्या. पहिल्या लाटेतून सावरत असताना दुस-या लाटेदरम्यान ५ एप्रिल २०२१ पासून महाराष्ट्रात मिनी लॉकडाऊन करण्याचा निर्णय झाला. मात्र परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत सरकारने संपूर्ण लॉकडाऊन करीत परिस्थिती नियंत्रणात आणावी, अशी मागणी व्यापारी महासंघाने केली होती. सरकारने ती मान्य केली नाही. मात्र, तरीही व्यापा-यांनी स्वयंस्फूर्तीने ५ एप्रिल ते ३१ मे, २०२१ दरम्यान बाजारपेठा संपूर्ण बंद ठेवत सरकारला मदत केली. असे असून देखील मागील चार महिन्यात पुणे शहरात कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असताना व रुग्णसंख्या सातत्याने कमी होत असताना देखील व्यवसायांच्या वेळांमध्ये सरकारने कोणत्याही प्रकारची शिथिलता देण्याचा निर्णय घेतलेला नाही, ही बाब व्यापा-यांच्या दृष्टीने निराशाजनक आहे, असंहि यावेळी रांका यांनी सांगितले.
दुकान उघडण्याची वेळ सं.10 ते रात्री 8 पर्यंत करावी -
पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक नियम शिथिल करण्यासह विकेंड लॉकडाऊनमधून शनिवार वगळण्याचा निर्णय पुढील दोन दिवसांत घेण्याचे सूतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले होते. मात्र, महापालिका आयुक्त यांनी शहरातील कोरोना प्रतिबंधक नियम तूर्त 'जैसे थे' राहती, असा आदेश काल काढला आहे. हे म्हणजे व्यापाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे. प्रशासनाने सध्याच्या दुकान उघडण्याच्या वेळा स. ७ ते ४ ऐवजी स. १० ते रात्री ८ अशा कराव्यात आणि शनिवारी देखील दुकाने चालू ठेवण्याची मुभा दयावी, जेणेकरून व्यापा-यांबरोबर ग्राहकांची देखील सोय होऊ शकेल अशी पुणे व्यापारी महासंघाची प्रमुख मागणी असल्याचेही रांका यांनी नमूद केले.

Last Updated : Aug 1, 2021, 5:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.