पुणे गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया.. अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव सोहळा येऊन ठेपला Ganpati Festival 2022 आहे. महाराष्ट्रात गणपती उत्सवासाठी लगबग सुरु झाली आहे. बाजारपेठ तसेच मूर्तिकार प्रत्येक जण हे बाप्पाच्या आगमनाच्या तयारीला लागला आहेत. सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. दोन वर्षांच्या निर्बंधांनंतर पुण्याची ओळख असलेला सार्वजनिक गणेशोत्सवही यंदा धूमधडाक्यात साजरा होणार Ganesh festival celebration in Pune आहे. या पार्श्वभूमीवर देखाव्यांच्या कामालाही वेग आला Ganeshotsav 2022 आहे. प्रसिद्ध मूर्तीकार सतीश तारू व त्यांचे सहकारी विविध विषयांवरील देखाव्यांसाठी मूर्ती साकारण्यात व्यग्र Sculptors busy in making idols आहेत.
राज्यभरातील विविध मंडळांचे तयार होतात देखावे पुण्यातील कसबा पेठ Pune Kasba Peth येथे गेल्या 50 वर्षापासून एक छंद म्हणून देखाव्याचे व्यवसाय करणारे मूर्तिकार सतीश तारू यांच्याकडे यंदाच्या गणेशोत्सवात विविध विषयांवरील देखावा बनविण्याचे काम आले आहे. फक्त पुणे शहर नव्हे तर राज्यातील विविध गणेश मंडळाच्यावतीने विविध सामाजिक तसेच राजकीय विषय घेऊन देखाव्यातून समाज प्रबोधन करण्याचे काम हे गणेश मंडळ करत states politics decoration in Ganesh Mandal असतात. पुण्यातील सतीश तारु यांच्याकडूनच राज्यातील विविध मंडळांची देखावे तयार केले Ganesh Chaturthi जातात. विशेष म्हणजे तारु हे फक्त समाज प्रबोधनावर आधारित देखावे तयार करतात कोणताही वाद होणार नाही अशा पद्धतीने देखावे ते बनवत नाही.
देखाव्यातून समाजप्रबोधन सध्या जगभरात तसेच देशात सुरू असलेल्या ज्वलंत विषय घेऊन गणेश मंडळे हे गणेशोत्सवात देखावे तयार करतात गणेश उत्सवात गड किल्ल्यांचे संवर्धन तसेच पर्यावरण, कोरोना योद्धा असे विविध विषयांवर यंदा देखावे करण्यात येणार आहेत. त्याचे काम हे अंतिम टप्प्यात आले आहे. विशेष म्हणजे यंदाच्या गणेश उत्सवात मागच्या दोन महिन्यात राज्यात जे सत्तानाट्य त्यावर आधारित देखील यंदाच्या गणेश उत्सव गणेश मंडळांच्या माध्यमातून विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती तसेच सत्ता नाट्य विविध विषयांवर देखावे तयार करण्यात येत आहे अशी माहिती यावेळी मूर्तिकार सतीश तारू यांनी दिली.
महागाईचा फटका गेली दोन वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सण उत्सव हे निर्बंधात साजरे करावे लागले.त्याआधी राज्यात निर्माण झालेल्या पूरस्थिती मुळे मंडळानी देखावेच तयार केले नाही.एकूणच 3 वर्षांनंतर कुठेतरी यंदा मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होणार अशी परिस्थिती असली तरी एकीकडे वाढत असलेली महागाई आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टीचे वाढत असलेले दर यामुळे मंडळांच्याकडेच पैसे नसल्याने महागाई वाढून देखील देखावे कारांना देखाव्यांची किंमत ही वाढवता येत नाही.मागच्याच वर्षीच्या किंमतीत देखावे हे विक्री कराव्या लागत असल्याने मोठ्या आर्थिक फटक्याला देखाव्या कारांना फटका बसलेला पाहायला मिळत आहे.