पुणे - गेल्या काही महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तूंमध्ये सातत्याने होत असलेल्या ( Necessary goods became expensive ) वाढीमुळे नागरिक हैरान झाले आहे. त्यातच आत्ता येत्या 1 ऑगस्ट पासून रिक्षांच्या भाड्यांमध्ये ( Increase in rickshaw fare ) देखील वाढ होणार आहे. आत्ता पुणेकरांना 1 ऑगस्ट पासून प्रती दीड किलोमीटरसाठी 23 रुपये मोजावे लागणार आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरण पुणे ( Regional Transport Authority Pune ) यांची आज संयुक्त बैठकीत पार पडली. या बैठकीमध्ये पुणे, पिंपरी चिंचवड, बारामती या तीन शहरांचे रिक्षा प्रवासामागे 3 रुपये भाडे वाढ करण्यात आली आहे.
हेही वाचा - Breaking : गुजरातमध्ये धक्कादायक घटना: बेकायदेशीर दारु पिल्याने 8 जणांचा मृत्यू!
आता २३ रुपये मोजावे लागणार - पाहिल्या प्रत्येक दीड किलोमीटरमागे सर्वसामान्य नागरिकांना २१ रुपये मोजावे लागत होते. मात्र, आता २३ रुपये मोजावे लागणार आहे. दीड किलोमीटरनंतर त्या पुढे प्रत्येक किलोमीटर मागे १४ रुपये मोजावे लागत होते. ते आता १५ रुपये नागरिकांना मोजावे लागणार आहे. वाढत्या महागाईचा काळात पेट्रोल-डिझेल बरोबरच सीएनजीच्या दरात चांगली वाढ झाली होती. 63 रुपयेच दर 85 रुपयांपर्यंत पोहचले होते. रिक्षा चालकांना या दरात प्रवाश्यांना सेवा देणे परवड नव्हते म्हणून रिक्षा चालकांनी भाडे वाढ करण्याची मागणी गेल्या काही काळापासून लावून धरली होती. आज प्रादेशिक परिवहन प्राधिकरण पुणे यांच्या संयुक्त बैठकीत 3 रुपयाने भाडे वाढ करण्याचा निर्णय झाला आहे. या निमित्ताने रिक्षा चालकांमध्ये आनंदच वातावरण पहायला मिळत आहे. परंतु असे असले तरी सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका बसणार आहे.
हेही वाचा - शिंदे गटाची गुंडगिरी; शिवसेना नगरसेविकेच्या पतीला जबर मारहाण