ETV Bharat / city

पुण्याच्या तरुणाकडून स्वच्छतागृहांच्या माहितीसाठी मोफत ॲपची निर्मिती, ॲपमधुन समजणार स्वच्छतागृह कुठे आहे - pune free app for information on toilets

हे ॲप हॉटेल, रेस्टॉरन्ट, कॅफेज, मॉल्स, बँका, पेट्रोल पंप, हॉस्पिटल्स, क्लिनिक्स, शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये या सर्वांशी जोडलेले आहे. ‘टॅायलेट सेवा’ हे ॲप मदत करू शकते. पुण्यामध्ये टॉयलेटसेवा बरोबर सहकार्याचा हात काहींनी पुढे केलेला आहे आणि स्वच्छतागृहाच्या बाहेर ‘टॉयलेटसेवा’ चा ‘क्युआरकोड’ लावलेला आहे. हे ॲप इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेमध्ये उपलब्ध असून अधिक माहिती साठी www.toiletseva.com ह्या वेबसाईटची मदत होऊ शकेल.

free app for information on toilets from youth of pune
पुण्याच्या तरुणाकडून स्वच्छतागृहांच्या माहितीसाठी मोफत ॲपची निर्मिती
author img

By

Published : Aug 2, 2022, 1:12 PM IST

पुणे - स्वच्छतागृहाची आवश्यकता भासल्यास ते नेमके कुठे आहे, याची माहिती मिळत नसल्याने अनेकांची कुचंबणा होते. हीच अडचण लक्षात घेऊन अमोल भिंगे या मूळच्या पुण्याच्या, परंतु परदेशी स्थायिक असणाऱ्या तरुणाने ॲपची निर्मिती केली आहे. ToiletSeva (टॉयलेटसेवा) या नावाच्या मोफत ॲपच्या माध्यमातून संपूर्ण भारतभरात कुठेही गेल्यास स्वच्छतागृहाची माहिती मिळू शकणार आहे.

पूर्णपणे मोफत ॲप - स्वच्छतागृह सहजतेने उपलब्ध होण्याबरोबरच ती स्वच्छ असणे हे आजकालच्या काळात थोडे अवघडच झाले आहे. प्रवासात किंवा काही कामानिमित्त घराबाहेर असताना पोटावरचा दबाव हलका करण्यासाठी आरोग्यकारक, सुरक्षित स्वच्छतागृहाची आवश्यकता असते. आपण ज्या परिसरात आहोत, त्या परिसरात असे सुरक्षित आणि स्वच्छ स्वच्छतागृह कोठे उपलब्ध आहे, हे अगदी सहजतेने कळावे यासाठी टॉयलेट सेवा हे पूर्णपणे मोफत ॲप विकसित करण्यात आले आहे.

कुचंबणा टाळणे शक्य - ॲप म्हणजे खरतरं एक चळवळ आहे. ज्या चळवळीद्वारे स्वच्छतागृहांच्या अभावी होणारी कुचंबणा टाळणे शक्य होणार आहे. या चळवळीद्वारे अशा स्वच्छतागृहांचे केवळ लोकेशनच समजणार आहे, असे नाही, तर अश्या एखाद्या स्वच्छतागृहाविषयबाबत आपला अभिप्राय देण्याबरोबरच इतरांचेही अभिप्राय वाचता येऊ शकतात. या ॲपचा वापर केवळ कोणत्याही एका मर्यादित शहरापुरता मर्यादित नसून, भारतातील कोणत्याही शहरात, गावात या ॲपचा वापर करता येऊ शकतो, हे या ॲपचे विशेष आहे.

तीन भाषांमध्ये उपलब्ध - हे ॲप हॉटेल, रेस्टॉरन्ट, कॅफेज, मॉल्स, बँका, पेट्रोल पंप, हॉस्पिटल्स, क्लिनिक्स, शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये या सर्वांशी जोडलेले आहे. ‘टॅायलेट सेवा’ हे ॲप मदत करू शकते. पुण्यामध्ये टॉयलेटसेवा बरोबर सहकार्याचा हात काहींनी पुढे केलेला आहे आणि स्वच्छतागृहाच्या बाहेर ‘टॉयलेटसेवा’ चा ‘क्युआरकोड’ लावलेला आहे. हे ॲप इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेमध्ये उपलब्ध असून अधिक माहिती साठी www.toiletseva.com ह्या वेबसाईटची मदत होऊ शकेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.