ETV Bharat / city

पुण्यात कोरोनाचे आणखी चार बळी; मृतांचा आकडा 37वर - corona in pune

आज शहरातील एकूण कोरोबाधितांपैकी चौघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये तीन महिला आणि एका 27 वर्षाच्या तरुणाचा समावेश आहे. संंबंधित महिलांमध्ये 42 वर्ष, 50 वर्ष, 77 वर्षाच्या महिलांचा समावेश आहे.

corona in pune
पुण्यात कोरोनाचे आणखी चार बळी; मृतांचा आकडा 37 वर
author img

By

Published : Apr 14, 2020, 3:54 PM IST

Updated : Apr 14, 2020, 4:13 PM IST

पुणे - शहरातील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. पॉझिटिव्ह रुग्णांच्या वाढत्या आकड्यासोबतच मृतांच्या संख्येत भर पडत आहे. आज शहरातील एकूण कोरोबाधितांपैकी चौघांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये तीन महिला आणि एका 27 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. यामध्ये कोंढव्यातील 50 आणि 42 वर्षीय महिला, घोरपडी गावातील 77 वर्षीय महिला आणि पर्वती दर्शन येथील 27 वर्षाच्या तरुणाचा समावेश आहे. या सर्वांना कोरोनसोबतच इतरही वेगवेगळे आजार होते. या व्यतिरिक्त आज दिवसभरात चार नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यात ससून रुग्णालयातील 34 वर्षाच्या नर्सचाही समावेश आहे. सध्या तिला आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे.

सध्या पुण्यात 250 हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुण्यातील भवानी पेठेत सर्वाधिक 69 रुग्ण सापडले आहेत. त्यापाठोपाठ कसबा, विश्रामबागवाडा परिसरात 33 रुग्ण आढळले आहेत. पुणे शहरातील हा वाढता संसर्ग पाहता शहरातील अनेक भाग सील करण्यात आले आहेत.

Last Updated : Apr 14, 2020, 4:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.