ETV Bharat / city

पाच वर्षाच्या मुलीचा गॅस्ट्रोने मृत्यू; शंभरहून अधिक रूग्णांवर उपचार सुरू

पाटण तालुक्यातील मारुल तर्फ पाटण गावात गॅस्ट्रोची लागण होवून 5 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. गॅस्ट्रोचे रूग्ण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा गावात तळ ठोकून आहे. गॅस्ट्रोची साथ आटोक्यात आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याची सूचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे.

मुलीचा गॅस्ट्रोने मृत्यू
मुलीचा गॅस्ट्रोने मृत्यू
author img

By

Published : Mar 25, 2021, 11:41 AM IST

कराड (सातारा) - पाटण तालुक्यातील मारुल तर्फ पाटण गावात गॅस्ट्रोची लागण झाल्याने 5 वर्षे मुलीचा मृत्यू झाला आहे. येथे शंभरहून अधिक रूग्णांवर उपचार सुरू आहेत. गॅस्ट्रोचे रूग्ण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा गावात तळ ठोकून आहे. गॅस्ट्रोची साथ आटोक्यात आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याची सूचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे.

हेही वाचा - गृहमंत्री अनिल देशमुखांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; म्हणाले चौकशी लावून, "दूध का दूध, पानी का पानी" करावे

दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोची लागण
मारूल तर्फ पाटण गावात तीन दिवसांपासून गॅस्ट्रोची लागण झाली असून त्यात पाच वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. तसेच गॅस्ट्रोची लागण झालेल्या रूग्णांची संख्याही वाढत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा गावात तळ ठोकून आहे. साथ आटोक्यात आणण्यासाठी घरोघरी सर्व्हे सुरू आहे. पाणी उकळून पिण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गावातील पाणी पुरवठा योजना कालबाह्य झाली आहे. पाणी पुरवठ्याची पाईप असलेल्या ठिकाणी खोल खड्डा असून त्यात प्रचंड दुषित पाणी साचले आहे. त्यामुळे गावात गॅस्ट्रोची लागण झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

हेही वाचा - मुंबईत लॉकडाऊन, रात्रीच्या संचारबंदीचा विचार नाही; महापालिका प्रशासनाची माहिती

नवीन पाणी पुरवठा योजना
गॅस्ट्रोमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी नवीन पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव सादर करण्याची सूचना ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांना केली आहे. नवीन योजनेसाठी आमदार फंडातून 15 लाख रुपयांच्या निधी मंजूर करण्याचे आदेश आपण जिल्हाधिकारी, जिल्हा नियोजन अधिकार्‍यांना देतो, असे सांगून सध्याच्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरु करण्याचे आदेशही त्यांनी ग्रामीण पुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांना दिले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.