पुणे - पुण्याचे वैभव असलेल गणेशोत्सव मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा करण्यात येत आहे. यंदाही साध्यापणाने गणेशोत्सव साजरा करण्यात आले असून रविवारी (दि. 19 सप्टेंबर) अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच विसर्जनाच्या दिवशी मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन दुपारी दीड वाजण्याच्या आत करण्यात आले. एखादी घटना वगळता सर्वच मानाच्या गणपती मंडळांनी यंदाही कोरोनाचे नियमाचे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्यात आले.
कसबा गणपतीचे साडे अकरा वाजण्याच्या सुमारास विसर्जन
मानाचा पाहिला श्री कसबा गणपती मंडळाच्यावतीने सकाळी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उत्तर पूजा करण्यात आली. 129 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महापौरांच्या हस्ते कसबा गणपतीची उत्तर पूजा करण्यात आली. त्यानंतर सभा मंडपातून थोड्याच अंतरावर पालखीने मिरवणूक काढण्यात आली. साडे आकरा वाजण्याच्या सुमारास बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.
श्री तांबळी जोगेश्वरी गणपतीचे साडे अकरा वाजण्याच्या सुमारास विसर्जन
मानाचा दुसरा श्री तांबळी जोगेश्वरी मंडळाच्यावतीने देखील मंडळाच्या बाहेर हौदातच महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पूजा करुन साडे अकरा वाजता विसर्जन करण्यात आले. तांबळी जोगेश्वरी मंडळाच्या वतीने हे पालखीत आणून थोड्याच अंतरावर मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.
गुरुजी तालीम मंडळ गणपतीचे सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास विसर्जन
मानाचा तिसरा पुण्याचा राजा, अशी ओळख असलेल्या गुरुजी तालीम मंडळाची उत्तर पूजा नगरसेवक रवींद्र धंगेकर आणि भाऊ रंगारी मंडळाचे उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर दुपारी सव्वाबारा वाजता जल्लोषमय वातावरणा बाप्पाला निरोप देण्यात आले.
तुळशीबाग मंडळ गणपतीचे सव्वा वाजण्याच्या सुमारास विसर्जन
मानाचा चौथा श्री तुळशीबाग मित्र मंडळाच्यावतीने महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली व पोलिसांनी पथकाकडून वाद्य साहित्य काढून घेतले. त्यानंतर मात्र बाप्पाच्या जय घोषात फुलांची उधळन करत सव्वा वाजण्याच्या सुमारास बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.
केसरी वाडा गणपतीचे दीड वाजण्याच्या सुमारास
मानाचा पाचवा श्री केसरी वाडा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. दीड वाजण्याच्या सुमारास बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागच्या वर्षी प्रमाणे यंदाही मानाच्या गणपती मंडळाचे शासनाच्या नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्यात आले आहे.
हेही वाचा - तुळशीबाग गणपतीसमोर ढोल-ताशा वादन.. कार्यकर्ते पोलिसांत बाचाबाची