ETV Bharat / city

धक्कादायक...! जबरदस्तीच्या वेश्याव्यवसायातून अल्पवयीन मुलगी गर्भवती, प्रसुतीनंतर प्रकार उघडकीस - Minor forced into prostitution

जबरदस्तीच्या वेश्याव्यवसायातून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याची घटना समोर आली. त्यानंतर ती प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर मुलीच्या वयाबाबत शंका निर्माण झाल्याने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी चौकशी केली असता, हा सर्व प्रकार उघडकीस आला.

वेश्याव्यवसायातून अल्पवयीन मुलगी गर्भवती

author img

By

Published : Jan 21, 2021, 12:00 PM IST

पुणे - शहरातील विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आई वडील नसलेल्या एका अल्पवयीन मुलीला जोडप्याने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. यातून ही मुलगी गर्भवती राहिली आणि तिने ससून रुग्णालयात एका बाळाला जन्म दिला. मात्र, या मुलीच्या वयाबाबत शंका निर्माण झाल्याने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी चौकशी केली असता, हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्यानंतर 17 वर्षीय पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून तृतीयपंथी महादेव उर्फ भारती काळे, माया महादेव उर्फ आरती काळे यांच्यासह तीन अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले-
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित मुलीच्या आई-वडिलांचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला आहे. त्यामुळे ती ओळखीच्या एका महिलेकडे लोहगाव परिसरात राहते. या ठिकाणी राहत असताना तिची धानोरी परिसरात राहणाऱ्या वरील आरोपींची ओळख झाली. आरोपींनी झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले. जानेवारी 2020 ते सप्टेंबर 2020 या कालावधीत चंदननगर परिसरातील एका लॉजवर घेऊन जात तिच्याकडून वारंवार वेश्याव्यवसाय करून घेतला. या प्रकारातून ही मुलगी गर्भवती राहिली. तिला ससून रुग्णालयात अॅडमिट करण्यात आले होते. 9 जानेवारीला तिने एका बाळाला जन्म दिला.

शहरात वेश्याव्यवसाय जोरात?-
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना या मुलीच्या वयावरून शंका निर्माण झाल्याने त्यांनी दक्षता समिती महिला सदस्यांच्या उपस्थितीत तिची चौकशी केली, त्यावेळी हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला आहे. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर पुण्यातील वेश्या व्यवसाय कोणत्या थराला जाऊन पोहोचलाय हे स्पष्ट झाले आहे. मागील अनेक महिन्यांपासून पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागासाठी जबाबदार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे शहरात वेश्याव्यवसाय जोरात सुरू असल्याचे चित्र आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.