पुणे - पुण्यात गोळीबार करून एका तरुणाची भरदिवसा हत्या ( Young man shot dead in Pune ) करण्यात आली आहे. भारती विद्यापीठ परिसरातील चंद्रभागा हॉटेल समोर दोघांनी दुचाकीवरून येऊन एका व्यक्तीवर भरदिवसा गोळीबार ( firing in Pune ) केल्याची ही घटना घडली आहे. तरुणाला ६ गोळ्या लागल्या असल्याची माहिती मिळली आहे. गोळ्या लागल्याने तरूणाचा मृत्यू झाला. या प्रकरणात एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू -
समीर उर्फ सम्या मणुर (वय ४०, रा. आंबेगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
तरुणावर झाडल्या ६ गोळ्या -
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आंबेगाव येथील चंद्रभागा चौकात गोळीबाराचा थरार ( Young man shot Bharti University Police Thane area ) घडला आहे. समीर हा चौकात उभारला होता. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर अगदी जवळून गोळीबार केला. यात त्याला ६ गोळ्या लागल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन त्याचा मृत्यू झाला. माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. दरम्यान शहरात भरदुपारी गोळीबार झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.