पुणे - लष्कर परिसरात नेपाळी तरुणीने बेकायदा प्रवेश करून तब्बल आठ महिने वास्तव्य केल्याचे समोर आले आहे. दापोडी येथील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात हा खळबळजनक प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे, ही तरुणी जवानांसाठी असलेल्या क्वाटर्समध्ये राहत होती. एलीसा मनोज पांडे खडका (वय २६, मूळ रा. लुंबिनी, नेपाळ) असे अटक करण्यात आलेल्या संशयितेचे नाव आहे. या प्रकरणी उपनिरीक्षक संजय काळे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोडी येथे लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात लष्करातील अधिकारी व जवानांचे वास्तव्य आहे. आरोपी एलीसा ही 23 मार्चपासून फुगेवाडीतील मॅकडॉनल्स येथील भिंतीवरून उडी मारून, सीएमई परिसरात येऊन गपचूप राहत होती. या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा - बारामतीत रुग्णाच्या नातेवाईकाची डॉक्टरांना जिवे मारण्याची धमकी, रुग्ण दगावल्याच्या तीन दिवसांनंतरचा प्रकार
हेही वाचा - उत्पादन शुल्क व कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची कोरोनावर मात