पुणे - पुण्यातील प्रसिद्ध बाबा भिडे पुलाजवळ तरुणींच्या दोन गटांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दोन गटातील अंदाजे 10-12 तरुणींनी एकमेकींना केस धरून लाथा बुक्क्यांनी जोरदार मारहाण केली. ही फ्री स्टाईल हाणामारी पाहण्यासाठी नदीपात्राजवळ बघ्यांची चांगलीच गर्दी झाली होती.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, नदीपात्रातील कठड्यावर तरुणींचा एक ग्रुप गप्पा मारत बसला होता. त्याचवेळी त्याठिकाणी दुचाकीवरून आणखी काही तरुणींचा ग्रुप आला. यानंतर या दोन्हीगटांमध्ये सुरूवातीला वादावादी आणि पुढे हाणामारी सुरू झाली. या सर्व मुली एकमेकींचे केस ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत होत्या. या सर्वांमध्ये एक तरुण हे भांडण सोडविण्याचा प्रयत्न करताना दिसतो. दरम्यान, घटनास्थळावरून जाणाऱ्या एका नागरिकाने आपल्या मोबाईलमध्ये हे भांडण चित्रीत केले आणि त्याचा व्हिडिओ सध्यासोशल मीडियावर वायरल होत आहे. प्रकरणी भांडण करणाऱ्या या तरुणी कोण होत्या?. कुठल्या कारणामुळे त्यांच्यात भांडण झाले या प्रश्नाचे अद्याप मिळू शकलेले नाही.
हेही वाचा - राजकारणातील अनेक गुपीतं काळाआड; प्रणव मुखर्जींच्या जीवनप्रवासावर एक दृष्टीक्षेप