ETV Bharat / city

भेसळयुक्त तेलाचे गोदाम सील; पुणे विभागात एफडीएची धडक कारवाई

पुण्यात अन्न आणि औषध विभागाने भेसळ विरोधी कडक करवाई केली. दोन कोटींहून अधिक किमतीच्या भेसळयुक्त खाद्यपदार्थ तसेच तेलाचा साठा सील केला आहे.

Warehouse seal of adulterated oil
भेसळयुक्त तेलाचे गोडाऊन सील
author img

By

Published : Oct 27, 2020, 1:08 PM IST

पुणे - पुण्यात अन्न आणि औषध विभागाने भेसळ विरोधी कडक करवाई केली. दोन कोटींहून अधिक किमतीच्या भेसळयुक्त खाद्यपदार्थ तसेच तेलाचा साठा सील केला आहे. दसरा, दिवाळीच्या काळात तेल, तूप, खवा, मैदा, आटा यांच्यात मोठ्या प्रमाणात भेसळ करण्याचे प्रकार होत असतात. या पार्श्वभूमीवर कुठलीही भेसळ होऊ नये, यासाठी पुणे विभागात अनेक ठिकाणी अन्न औषध विभागाने धडक कारवाई केली आहे.

पुणे विभागात एफडीएची धडक कारवाई

दोन कोटींहून अधिक किंमत असलेले तेलाचे गोदाम सील..

विभागाने केलेल्या या कारवाईत आत्तापर्यंत पुणे विभागात दोन कोटींहून अधिक किंमत असलेले तेलाचे गोदाम सील केले आहेत. अन्न आणि औषध प्रशासनाने केलेली धडक कारवाई अन्यायकारक असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. सणासुदीच्या तोंडावर चुकीची कारवाई केली गेल्याचा आरोप संबंधित तेल उत्पादक करीत आहे.

हेही वाचा-'भाजपा नेत्यांनी जास्त टरटर करू नये'... सरकारच्या बाजूने नवाब मलिकांची मैदानात उडी!

खाद्य पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर प्रशासनाची करडी नजर..

दरम्यान, अन्न आणि औषध विभागाने केलेली ही कारवाई नियमानुसार करण्यात आली आहे. अन्न आणि औषध प्रशासन हे कोणत्याही व्यापाऱ्यावर पूर्वग्रहदूषित धरून कारवाई करत नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात खाद्य पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर प्रशासनाची करडी नजर असणार आहे. दुसरीकडे तेल उत्पादकावर झालेली कारवाई म्हणजे चोर सोडून संन्याशाला शिक्षा असा प्रकार असल्याचे व्यापारी संघटनांचे म्हणणे आहे.

...तर ऐन दिवाळीत तेलाचा व्यापार बंद ठेवू

या कारवाईबाबत दि पूना मर्चंटस असोसिएशनने नाराजी व्यक्त केली आहे. भेसळ करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी आमचीही भूमिका आहेच. मात्र, भेसळ करणाऱ्या कंपन्यावर कारवाई न करता, त्या कंपनींचे पॅकिंग तेल विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई केली जाते आहे. हे चुकीचे आहे. ही कारवाई थांबवली नाही तर ऐन दिवाळीत तेलाचा व्यापार बंद ठेवू, असा इशारा व्यापारी संघटनेने दिला आहे.

हेही वाचा-दसरा मेळाव्यात मुख्यमंत्र्यांकडून केवळ पोकळ घोषणा - विनायक मेटे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.