पुणे : भोंगे वाजवायला तुम्हाला भरपूर वेळ आहे. तुम्ही ( Raju Shetty On Loudspeaker ) वाजवा. मात्र शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या आणि तुमचं राजकारण ( Loudspeaker Politics Maharashtra ) करा, असं मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पुण्यात बोलताना व्यक्त केलं ( Raju Shetty On Electricity To Farmers ) आहे.
भोंग्याच राजकारण जाणून बुजून : सध्या भोंग्यावरून जे राजकारण सुरू आहे, हे सगळं जाणून बुजून केलं जात असल्याचा आरोप देखील राजू शेट्टी यांनी केला आहे. देशात महागाई वाढली आहे. शेती साहित्य घेणं शेतकऱ्यांना परवडत नाही, आणि महाराष्ट्रात हनुमान चालीसा आणि वाजवा भोंगे याचे राजकारण सुरू असून, हे दुर्दैवी असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
कोल्हापूर निवडणुकीत महात्मा गांधींची नोट चालली : आज कोल्हापूर पोटनिवडणुकीचा निकाल देखील आला आहे. यात काँग्रेसच्या जयश्री जाधव या विजयी झाल्या आहेत. यावर सुद्धा राजू शेट्टी यांनी भाष्य केल आहे. या निवडणुकीत सगळ्याच पक्षांनी प्रचाराची पातळी गाठली असा आरोप करत त्यांनी हे लोकशाहीसाठी घातक असल्याचं सांगितलं आहे. त्याचबरोबर या पोटनिडणुकीत महविकास आघाडीसह भाजपने देखील मोठ्या प्रमाणात पैसे वाटले. त्यामुळं कोल्हापूर निवडणुकीत महात्मा गांधींची नोट चालली, असा आरोप देखील राजू शेट्टी यांनी केला आहे.
आम्हाला फरक नाही : त्याचबरोबर या निवडूकीत आम्ही कुठलीच भूमिका घेतली नव्हती. त्यामुळे कोण जिंकलं किंवा कोण हरलं यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही फक्त आमच्या शेतकऱ्यांचं हित जोपासत आहोत, असं मत देखील राजू शेट्टी यांनी मांडलं आहे.
हेही वाचा : 'मुस्लिमांनी मशिदीत जरूर प्रार्थना करावी पण अजान मशिदीपुरतीच मर्यादित रहावी'