ETV Bharat / city

Valentine Week : मावळचा गुलाब भारतीय बाजारात; चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद - मानऴच्या गुलाबाला टांगला भाव

सोमवार पासून व्हॅलेंनटाईन डेच्या ( Valentine Day 2022) आठवड्याला सुरुवात झाली आहे. लाल, पिवळा, केशरी, पांढरा गुलाब तरुणांना भुरळ घालत आहे. यावर्षी गुलाब उत्पादक शेतकऱ्यांमध्ये देखील मोठा उत्साह असून मावळमधील गुलाब अवघ्या देशभरात विक्रीसाठी सज्ज झाला आहे.

Mawla's roses
Mawla's roses
author img

By

Published : Feb 8, 2022, 4:35 PM IST

पुणे - व्हॅलेंनटाईन डेचे ( Valentine Day 2022) स्वागत करण्यासाठी मावळ मधील गुलाब सज्ज झाला आहे. दर वर्षी चांगला भाव मिळत असल्याने परदेशात गुलाब पाठवला जायचा. परंतु, यावर्षी चित्र उलट असून भारतीय बाजारांमध्ये गुलाबाला चांगला दर मिळत असल्याने गुलाब उत्पादक शेतकऱ्यांनामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मावळचा गुलाब भारतीय बाजारात
सोमवार पासून व्हॅलेंनटाईन डेच्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. लाल, पिवळा, केशरी, पांढरा गुलाब तरुणांना भुरळ घालत आहे. यावर्षी गुलाब उत्पादक शेतकऱ्यांमध्ये देखील मोठा उत्साह असून मावळमधील गुलाब अवघ्या देशभरात विक्रीसाठी सज्ज झाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच संकट असल्याने गुलाब शेतकरी अडचणीत सापडला होता. काही शेतकऱ्यांना तर गुलाब शेती बंद करण्याची वेळ आली अस शेतकऱ्यांनी सांगितलं.
Mawla's roses
चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद

40 टक्के गुलाबाची निर्यात
यावर्षी मात्र कोरोनाचे संकट कमी आहे. भारतातून परदेशात मर्यादित विमान सेवा असल्याने 40 टक्के गुलाब निर्यात करण्यात आला आहे. तर, 60 टक्के गुलाब हा भारतीय बाजार पेठांमध्ये विक्रीसाठी पाठवण्यात आलाय. दरम्यान, भारतीय बाजारामध्ये गुलाबाला चांगला दर मिळत असून त्याची मागणी देखील वाढली आहे. प्रत्येकी गुलाबाला 20 ते 21 रुपये मिळू शकतात अस इंडियन सोसायटी ऑफ फ्लोरिकल्चर प्रोफेशनल्स (आयएसएफपी) चे अध्यक्ष प्रवीण शर्मा यांनी सांगितलं आहे. भारतात कोरोना आटोक्यात आला असून निर्बंध उठवल्याने लग्न आणि इतर समारंभ सुरुवात झाल्याने गुलाबाच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे, असेही ते म्हणाले आहेत. त्यामुळं किमान गुलाब उत्पादक शेतकऱ्यांना तरी अच्छे दिन आले आहेत असेच म्हणावं लागेल.

हेही वाचा - Special Story on Rose Day : कोणत्या रंगाचा गुलाब कधी वापरायचा, जाणून घ्या गुलाबांचे प्रकार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.