ETV Bharat / city

पुण्यात तोतया पोलिसाचा पर्दाफाश, गुन्हा दाखल - पुणे क्राईम न्यूज

पत्नीला पोलीस अधिकारी असल्याचे भासवण्यासाठी पोलिसांचा गणवेश घालून फिरणाऱ्या एका तोतयाला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. भाऊसाहेब महादेव गोयकर (वय 25 वर्ष) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

Fake police exposed in Pune
तोतया पोलिसाचा पर्दाफाश
author img

By

Published : Dec 13, 2020, 5:39 PM IST

पुणे- पत्नीला पोलीस अधिकारी असल्याचे भासवण्यासाठी पोलिसांचा गणवेश घालून फिरणाऱ्या एका तोतयाला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. भाऊसाहेब महादेव गोयकर (वय 25 वर्ष) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, वानवडी पोलीस स्टेशनचे पोलीस गस्त घालत असताना, त्यांना पोलिसांच्या गणवेशात एक व्यक्ती दिसला. त्याच्या खांद्यावर मपो ऐवजी मपोसे असे लावले होते. त्यामुळे पोलिसांना त्याचा संशय आला. पोलिसांनी त्याच्याकडे ओळखपत्राची मागणी केली असता, त्याच्याकडे ओळखपत्र नसल्याने पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली. पोलीस चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.

पत्नीला पोलीस अधिकारी असल्याचे भासवण्यासाठी आरोपी बनला तोतया पोलीस

आरोपी हा मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील रहिवाशी आहे. त्याचा स्वतःचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. लॉकडाऊन काळात त्याने पत्नीला आपण पोलिसात भरती झाल्याचे खोटे सांगितले होते. पत्नीला हे खरे वाटावे म्हणून आरोपी पोलीस असल्याचे नाटक करत होता. वानवडी पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून मोबाई, रोख रक्कम, पोलिसांचा गणवेश, आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.