पिंपरी-चिंचवड ( पुणे ) - शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची घोडेस्वारी म्हणजे वराती माघून घोडे, अशी आहे असा टोला शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी ( Shivaji Adhalrao Patil Slammed over Amol Kolhe ) लगावला आहे. ते ईटीव्ही भारतशी बोलत होते.
लिंबगाव येथील मानाच्या खंडोबा घाटात आज सकाळपासून नागरिकांचे मनोरंजन करण्याचे काम खासदार अमोल कोल्हे ( Amol Kolhe entertainment in Khandoba Ghat ) यांनी केले आहे. त्यांनी नागरिकांची होणारी फसवणूक थांबवावी, ( Amol Kolhe cheating people ) असे आढळराव पाटील यांनी म्हटले आहे.
हेही वाचा-जिल्हा न्यायालयाने ४ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्यास सुनावली मरेपर्यंत जन्मठेप
ती केवळ नागरिकांची फसवणूक-
शिवाजी आढळराव पाटील म्हणाले की, हा पठ्ठ्या पहिल्या बारी पुढे घोडीवर बसून घाट गाजवणार, असा शब्द कोल्हे यांनी निवडणुकीच्या अगोदर दिला होता. मात्र, आज त्यांनी घोडीवर बसून मारी मारली. ती केवळ नागरिकांची फसवणूक आहे. वरातीमाघून घोडे, अशी परिस्थिती अमोल कोल्हेची झाल्याचा टोला आढळराव पाटील यांनी लगावला आहे.
हेही वाचा-Cabinet Meeting Decision : अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चपासून; वाचा, राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय
ती घोडी मालिकेतील आहे- शिवाजी आढळराव पाटील
बैलगाडा शर्यतीची ( Bull cart race in Maval ) पहिली बारी ही 11 आणि 12 फेब्रुवारी रोजी मावळ आणि लांडेवाडी येथील घाटात झाली आहे. तेव्हा अमोल कोल्हे कुठे होते असा प्रश्न आढळराव यांनी विचारला आहे. त्यामुळे नागरिकांची फसवाफसवी त्यांनी थांबवावी. शब्द पाळला हे केवळ थोतांड आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. आज ज्या घोडीवर अमोल कोल्हे बसले होते, ती छत्रपती संभाजी महाराज यांच्या मालिकेतील आहे. ती, मुंबई येथून आणली आहे. ती शर्यतीत धावण्याच्या लायकीची नाही, असे देखील ते म्हणाले आहेत.
त्यांची बारी फसलेली आहे - शिवाजी आढळराव पाटील
अमोल कोल्हे यांची ही नौटंकी आहे. ते गर्दी खेचण्यासाठी शब्दफेक करतात. त्यांनी शब्द पाळलाच नाही. घोडीवर बसणार, असा शब्द कोल्हे यांनी दिला होता. बैलगाडा पुढे पळणारी घोडी वेगळी असते. ती शेतकऱ्यांना माहीत आहे. घोडी आणि खासदार अमोल कोल्हे हे बैलगाड्याच्या पाठीमागे होते. तर बैल पुढे होते. त्यामुळे त्यांची बारी फसलेली आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
हेही वाचा-Amol Kolhe Reacted On Godase Role : राजकारण आणि अभिनयाची गल्लत करू नका - खासदार अमोल कोल्हे
खासदार अमोल कोल्हे यांनी जिंकली सर्वांची मने-
आज खेडमधील मानाच्या खंडोबा घाटात अमोल कोल्हे यांनी घोडीवर स्वार होऊन घाट गाजविला आहे. दोन्ही हात उंचावत त्यांनी सर्वांना अभिवादन केले. पण सर्वांची मने जिंकली आहेत. पहिल्या बारीत संसदेचे सत्र असल्याने पहिल्य घोडीवर बसू शकलो नाही, असे अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले आहे.