पुणे - राज्यात कोरोनाबरोबरच ओमायक्रॉनचे देखील रुग्ण वाढत चालले आहेत. कालच राज्यातील 5 प्रमुख शहरे मुंबई, मुंबई उनगर, ठाणे, पुणे आणि नागपूर ही ओमायक्रॉनच्या नवीन तिसऱ्या लाटेच्या संपर्कात आलेली आहेत. राज्य सरकारच्यावतीने नवीन निर्बंध लावण्यात आले आहेत. त्या निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करून जनतेने स्वतःच्या प्राणाची आणि जिवाची रक्षा करावी, असे आवाहन राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत ( Energy Minister Nitin Raut visit Vijay Stambh ) यांनी नागरिकांना केले आहे.
हेही वाचा - Girl Commits Suicide: मालकिणीने लावला चोरीचा आरोप,17 वर्षीय तरुणीची आत्महत्या
अजूनतरी लॉकडाऊनची काहीच शक्यता नाही
सध्या वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पर्श्वभूमीवर निर्बंध कडक करण्यात येतील. पण, अजूनतरी लॉकडाऊनची काहीच शक्यता नाही, असे मत देखील राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
आंबेडकरी जनतेला न्याय मिळेल
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार संपूर्ण नागरिकांमध्ये पोहचविण्यासाठी आणि त्या विचारांवर चलण्यासाठी कटिबद्ध राहू या. आणि या देशातील जातीवादी शक्तीचा नायनाट करू या, असे देखील राऊत म्हणाले. तसेच, आंबेडकरी जनतेला न्याय मिळेल. 2018 साली झालेल्या दंगलीबाबत महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसपक्षच्या वतीने हे मुद्दे उपस्थित करण्यात आले आहे. आणि निश्चितच येणाऱ्या काळात त्याच्यावर निर्णय होईल आणि आंबेडकरी जनतेला न्याय मिळेल, असे राऊत म्हणाले.
जी काही खोटी केसेस लावण्यात आलेली आहेत, ती देखील मागे घेण्यात येणार आहेत, असे देखील राऊत म्हणाले. दलित समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करणार, काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून दलित समाजाच्या विकासाठी जे सांगितले आहे त्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच, काँग्रेस पक्षाच्या सर्व लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, असा संकल्प मी नवीन वर्षात केला आहे, असे देखील यावेळी राऊत म्हणाले.
हेही वाचा - Ramdas Athavale's New Year's Resolution : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला नविन वर्षांचा 'हा' संकल्प