पुणे - शिवसेना नेते एकनाथ शिंदे ( Shiv Sena leader Eknath Shinde ) यांच्या बंडात सामील झालेले आमदारां विरोधात शिवसैनिक आक्रमक ( Shiv Sainik aggressive ) होत राज्यभर आंदोलन करत आहे. तर काही ठिकाणी कार्यकर्ते हे एकनाथ शिंदे यांना समर्थन ( Support to Eknath Shinde ) दाखवत आहे. अशातच राज्यात शिवसैनिकांमध्ये फूट पडल्याचे चित्र दिसून येत आहे.
तानाजी सावंत यांचे कार्यालय फोडले - काल शिवसैनिकांनी नाशिकमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पोस्टरला काळे फासत आंदोलन केले होते. आता मंत्री तानाजी सावंत यांचे कार्यालय संतप्त शिवसैनिकांनी फोडले आहे. शिवसैनिकांमध्ये प्रचंड रोष दिसून येत आहे. त्यांनी तानाजी सावंत यांच्या कार्यालयातील टेबल, खुर्च्या, काचांची तावदाने फोडून टाकली आहेत.
उद्धव ठाकरे यांच्यासोबत - पुणे शहरातील सर्व कार्यकर्ते हे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत असून कोणीही बंड नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत नाहीये.आम्ही शहरातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे पक्षप्रमुख यांच्या सोबत असल्याचं यावेळी मोरे यांनी सांगितल आहे. ज्या नेत्यांनी बंड पुकारला आहे.त्या नेत्यांच्या विरोधात येत्या 2 दिवसात पुणे शहर शिवसेना पक्षच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात येणार आहे. असं देखील यावेळी मोरे यांनी सांगितल.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवनेनेमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. कालपासून शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख आणि शिवसैनिकांच्या दोन बैठका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतल्या. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनीही शिवसैनिकांना मार्गदर्शन केले होते. शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता शिवसैनिकांना रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा दिला होता. त्यानंतर शिवसैनिकांच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात आक्रमक प्रतिक्रिया दिसू लागल्या होत्या. पुण्यामध्ये शिवसेना ( Shivsena ) नेते आमदार तानाजी सावंत यांचे कार्यालय संतप्त शिवसैनिकांनी फोडले आहे.
हेही वाचा -शिवसैनिक आक्रमक, पुण्यात राडा, संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर राज्यभर वणवा भडकणार