ETV Bharat / city

NCP Holi In Pune : ईडी, सीबीआय, महागाई अन् पुण्यातील भाजपच्या भ्रष्टाचाराची राष्ट्रवादीने केली होळी.. ठोकल्या बोंबा

सगळीकडे होळीचा सण साजरा करण्यात येत असताना पुण्यात राष्ट्रवादीने प्रतीकात्मक होळीचे दहन ( NCP Holi In Pune ) केले. महागाई, जातीवाद, सत्तेचा दुरुपयोग आणि पुण्यातील भाजपच्या भ्रष्टाचाराची राष्ट्रवादीने होळी ( NCP Criticized BJP ) केली. यावेळी जोरदार बोंबा ठोकण्यात आल्या.

महागाई, जातीवाद, सत्तेचा दुरुपयोग अन् पुण्यातील भाजपच्या भ्रष्टाचाराची राष्ट्रवादीने केली होळी

author img

By

Published : Mar 17, 2022, 7:34 PM IST

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहर मध्यवर्ती कार्यालयात केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे वाढलेली महागाई, भ्रष्टाचार, जातिवाद तसेच पुणे महानगरपालिकेतील भाजपचे ई व्हेईकल घोटाळा, नदी सुधार घोटाळा, ५८ कोटींचा सिग्नल घोटाळा, १४ लाखांचा झाड घोटाळा या विविध घोटाळ्यांच्या अनिष्ट व नकारात्मक गोष्टींचे दहन करत प्रतिकात्मक होळी साजरी ( NCP Holi In Pune ) केली.

आवाज दडपण्याचा प्रयत्न

यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, आज होळी या सणाच्या निमित्ताने आपण घरोघरी असत्य, अन्याय, अत्याचार यांसह अनेक अनिष्ट तत्वांची होळी करत नकारात्मक गोष्टींतून नव्या सकारात्मक गोष्टींकडे वाटचाल करत असतो. आज या प्रतिकात्मक होळीच्या माध्यमातून केंद्रातील सत्ताधारी भाजप असो व महानगरपालिकेत गेल्या पाच वर्षात कारभारी करणारी करणारी भाजप असो दोन्ही ठिकाणी सत्ताधारी भाजपमुळे नागरिकांना विविध त्रासांना सामोरे जावे लागले. आजही महागाई, जातिवाद, धार्मिक तेढ हे मुद्दे गंभीर बनले असून, जर विरोधी पक्षातील कोणी या मुद्द्यांवर आवाज उठवला तर त्यांना केंद्रीय तपास यंत्रणांचा धाक दाखवत छापेमारी, धाडसत्र, अटक यांसारखी दडपशाही करत विरोधी पक्षातील जनतेचा आवाज उचलणाऱ्या नेत्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशातील या संपूर्ण परिस्थितीवर कुणाचाही अंकुश राहिलेला नाही, अशा परिस्थितीत या प्रतिकात्मक होळीच्या माध्यमातून सर्व अनिष्ट प्रवृत्तींच आम्ही दहन करत ( NCP Criticized BJP ) आहोत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.