ETV Bharat / city

पॉलिटीशियन थापा मारतात - डॉ. सायरस पूनावाला - पुनावाला पत्रपरिद

एका वर्षात संपूर्ण देशाचे लसीकरण शक्य नाही. राजकारणी थापा मारतात. महिन्याला दहा किंवा अकरा कोटी लसीचे डोस देणे अवघड आहे. लसीच्या किमतीत बदल झाल्याने सीरमचा नफा मोठ्या प्रमाणात बुडाला, पण भारतातील लोकांना लस मिळावी यासाठी आम्ही तो सहन केला, असेही पूनावाला यांनी सांगितले.

डॉ. सायरस पुनावाला
डॉ. सायरस पुनावाला
author img

By

Published : Aug 13, 2021, 3:29 PM IST

Updated : Aug 14, 2021, 8:25 AM IST

पुणे - कोव्हिशील्ड लस घेतल्यानंतर सहा महिन्यांनी शरीरातील एन्टीबॉडीज कमी होतात, असा रिपोर्ट छापून आला आहे. ते खरे आहे. त्यामुळेच तिसरा बुस्टर डोस घ्यायला हवा. मी स्वतः तिसरा बुस्टर डोस घेतला. मोदी सरकारने लस परदेशात पाठवायला बंदी घालुन अतिशय वाईट गोष्ट केली, असे वक्तव्य सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांनी केले आहे. आज (शुक्रवारी) पुण्यात त्यांना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (हिंद स्वराज्य संघ) वतीने लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

सीरमचे अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला

एका वर्षात संपूर्ण देशाचे लसीकरण शक्य नाही. राजकारणी थापा मारतात. महिन्याला दहा किंवा अकरा कोटी लसीचे डोस देणे अवघड आहे. लसीच्या किमतीत बदल झाल्याने सीरमचा नफा मोठ्या प्रमाणात बुडाला, पण भारतातील लोकांना लस मिळावी यासाठी आम्ही तो सहन केला, असेही पूनावाला यांनी सांगितले. कोरोनावरील लसीची गरज कमीत कमी असावी. मला लोकांच्या दुखातुन पैसै कमवायचे नाहीत. मी सरकारला सांगितले की पुण्याला जास्त लस द्या, कारण पुण्यात जास्त कोरोना आहे.परंतु ते माझे एकत नाहीत, अशी नाराजी सायरस पूनावाला यांनी व्यक्त केली.

कोव्हिशील्ड लस घेतल्यानंतर सहा महिन्यांनी शरीरातील एन्टीबॉडीज कमी होतात, असा रिपोर्ट छापून आला आहे. ते खरे आहे. त्यामुळेच तिसरा बुस्टर डोस घ्यायला हवा. मी स्वतः तिसरा बुस्टर डोस घेतला. मोदी सरकारने लस परदेशात पाठवायला बंदी घालुन अतिशय वाईट गोष्ट केली. माझा मुलगा मला म्हणाला, की यावर तोंड उघडू नको, पण मी यावर बोलणार आहे. कारण सीरम इन्स्टिट्यूट अनेक वर्षांपासून जगातील एकशे सत्तर देशांना लस पुरवते. पण आता त्यांना गरज असताना त्यांना लस देता येत नाही. या देशांनी लसीसाठी आधीच पैसे दिलेत. बील गेट्सने पाच हजार कोटी रुपये दिले आहे, असेही यावेळी पूनावाला म्हणाले.

कोरोनावरील दोन लसींचे कॉकटेल करण्याच्या मी विरोधात आहे. कारण ते कॉकटेल परिणामकारक ठरले नाही, तर ज्या दोन लसींचे कॉकटेल तयार करण्यात आले असेल त्या कंपन्या एकमेकांना दोष देतील. अदर पुनावाला सुट्ठीसाठी लंडनला गेले होते. त्यांना धमकी नव्हती. या विषयाचा अधिक गवगवा करण्यात आला. सर्वांना लस देणे सोपी गोष्ट नाही. लॉकडाउन नसायला हवा. लॉकडाउन नसेल तर हर्ड इम्युनिटी भेटेल, अशी प्रतिक्रियाही डॉ. सायरस पूनावाला यांनी दिली आहे.

Last Updated : Aug 14, 2021, 8:25 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.