ETV Bharat / city

पुण्यात फटाक्यांच्या आतषबाजीने 19 ठिकाणी आगीच्या घटना

लक्ष्मीपूजनादिवशी पुणेकरांनी केलेल्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे शहराच्या वेगवेगळ्या भागात 19 ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. वेगवेगळ्या भागात लागलेली आग आटोक्यात आणताना अग्निशमन जवानांची धावपळ उडाली.

author img

By

Published : Nov 15, 2020, 10:10 PM IST

diwali  Firecrackers  pune
पुण्यात फटाक्यांमुळे आग

पुणे - दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मीपूजनादिवशी पुणेकरांनी केलेल्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे शहराच्या वेगवेगळ्या भागात 19 ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान आगीच्या या घटना किरकोळ असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.

लक्ष्मीपूजनानंतर फटाक्यांची आतषबाजी -
लक्ष्मीपूजन झाल्यानंतर शनिवारी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. आतषबाजीमुळे वेगवेगळ्या भागात आग लागण्याच्या घटना घडल्या. छतावर साठलेला कचरा, टाकाऊ वस्तुंनी पेट घेतल्याच्या घटना घडल्या. गुरुवार पेठेतील फुलवाला चौक, सिंहगड रस्त्यावरील सनसिटी परिसरात एका घरात आग लागल्याची घटना घडली. पौड रस्त्यावरील बाबाज गार्डन हॉटेल, फरासखाना पोलीस ठाण्याच्या इमारतीतील गच्चीवर साठलेल्या कचऱ्याला आग लागली. येरवड्यातील गणेशनगर परिसरात कचऱ्याला आग लागली. शहराच्या वेगवेगळ्या भागात 19 ठिकाणी आग लागण्याचे प्रकार घडले.

अग्निशमन दलाची धावपळ -
बहुतांश ठिकाणी फटाक्यांमुळे आग लागल्याच्या घटना घडल्या. मध्यरात्रीपर्यंत आग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षातील दूरध्वनी खणखणत होता. वेगवेगळ्या भागात लागलेली आग आटोक्यात आणताना जवानांची धावपळ उडाली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.