पुणे - कोरोगांव भीमाची लढाई ही पेशव्यांच्या ( Bhima Koregaon War ) विरोधात होती, तर तस काहीही नसून 1 जानेवारी 1818 रोजी कोरोगाव भीमा येथे झालेली लढाई ही फक्त एक चकमक होती आणि तेव्हा ब्रिटिशांनी फक्त डिफेन्स केला आणि तसा उल्लेखही स्तंभावर आहे, असं मत '1 जानेवारी 1818 कोरोगाव भीमा लढाईचे वास्तव' हे पुस्तक लिहिलेल्या अॅड. रोहन जमादार माळवदकर ( Rohan Malavkar Book On Bhima Koregaon War ) यांनी मांडलं आहे. आता याच पुस्तकावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले माळवदकर -
समकालीन संदर्भ आणि पुराव्यांसह कोरेगाव भीमा लढाईची सत्य माहिती देणारे हे पुस्तक असल्याचं माळवदकर यांचं म्हणणं आहे. जाती अंताच्या नावाखाली समाजात जातीय तेढ निर्माण होईल, अशा पद्धतीने कोरेगावच्या लढाईचा खोटा इतिहास मांडला जात आहे. या लढाईत शौर्य गाजविणारे खंडोजीबीन गजोजी माळवदकर यांना इंग्रजांनी जयस्तंभाचे इन-चार्ज नेमले. त्यांचा वंशज या नात्याने खरा इतिहास समोर यावा, सामाजिक सलोखा कायम राहावा, या उद्देशाने संदर्भ पुराव्यांच्या आधारे दोन शतकांपूर्वी झालेल्या कोरेगाव भीमाच्या लढाईचे वास्तव सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न या पुस्तिकेच्या माध्यमातून केला आहे. असंही ते म्हणाले.
अनेकांनी केले पुस्तकाचे समर्थन -
आता या पुस्तकावरून पुन्हा वादंग निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण यावरून पुन्हा राज्यात दोन गट निर्माण होताना दिसत आहेत. एकीकडे काहीजण याला समर्थन देत आहेत, तर काहीजण याला विरोध करत आहेत. जानेवारीला फक्त चकमक घडली होती. त्याला लढाई म्हणता येणार नाही. त्यामुळं तिथं कोणीच जिंकल किंवा कोण हारलं हा विषय नाही. फक्त आपल्या राजकीय अस्मितेपोटी इतिहास बदलला जात असून हे चुकीचं आहे. जे काही पुरावे सापडतात, ते देखील हेच दर्शवतात. तसेच बाबासाहेबांनीदेखील कधीच अस सांगितल नाही आणि हेच सत्य आहे. समाजात फूट न पाडता खरा इतिहास समाजापर्यंत यावा एवढीच माझी इच्छा असल्याची प्रतिक्रिया इतिहास तज्ञ संजय सोनवणे यांनी दिली आहे. तसेच हाच इतिहास खरा असून अनेक वर्षानी खरं काय तो समोर आले आहे. जर हे खोटं आहे, तर तुम्ही खरा इतिहास समोर आणा, असे आवाहन देत आमचा या पुस्तकाला पूर्ण पाठिंबा असल्याची माहिती ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी दिली आहे.
तर अनेकांचा पुस्तकाला विरोध -
तर रोहन माळवदकर हे काही लेखक किंवा इतिहासकार नाहीत. त्यामुळे माहिती नसेल्या गोष्टींबद्दल खोटा इतिहास सांगून लोकांच्या डोळ्यात धूळ फेक करण्याचे काम त्यांनी करू नये. दोन समजात तेढ निर्माण होऊ नये म्हणून मी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या पुस्तकावर बंदी घालावी, अस निवेदन दिले असल्याची माहिती सचिन खरात यांनी दिली. तसेच या पुस्तकात इतिहासाचा विपर्यास केला आहे. रोहन माळवदकर यांना त्यांच्याच परिवाराचा इतिहास माहिती नाही. ती लढाई पेशवे विरुद्ध ब्रिटिश अशीच होती आणि याचे यांचे पूर्वज खंडोजी माळवदकर हे इंग्रजांकडून लढताना जखमी झाले आणि त्यामुळे त्यांना सनद आणि इनाम मिळाला आणि हे आपला परिवार इंग्रजांकडून लढला हे सत्य लपविण्यासाठी खोटा इतिहास सांगत आहेत, असा थेट आरोप भिमाकोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी केला आहे.
हेही वाचा - Mayor Kishori Pednekar on BJP : हत्तीच्या पिल्लाचे 'चंपा', माकडाच्या पिलाचे नाव 'चिवा' ठेवू - महापौर पेडणेकर