पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकीकडे देशभरात 11 ते 14 एप्रिलदरम्यान लसीकरण महोत्सव साजरा करण्याची घोषणा केली खरी, पण दुसरीकडे राज्यात फक्त 2 दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा शिल्लक आहे, दस्तुरखुद्द राज्याचे लसीकरण मोहिमेचे प्रमुख डॉ. डी. एन. पाटील यांनी ही माहिती दिली आहे.
दररोज एक लाख नागरिकांना लस देण्याचे नियोजन
राज्यात दररोज साडेचार लाख लसीचे डोस दिले जातात. सरकारकडे आताच्या घडीला अवघे 9 लाख डोस शिल्लक आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्राला लसीचा स्टॉक वाढवून द्यावा, अशी मागणीही डॉ. पाटील यांनी केली आहे. लसीचा साठा मर्यादित असल्याने अनेक अडचणी देशात सर्वाधिक सक्रिय रुग्णसंख्या असलेल्या दहा जिल्ह्यांमध्ये पुणे जिल्ह्याचा समावेश आहे. त्यामुळे प्रशासनाने अधिकाधिक लसीकरण करण्यासाठी ‘१०० डेज’ ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत दररोज एक लाख नागरिकांना लस देण्याचे नियोजन केले आहे. ही मोहीम ५ एप्रिलला सुरू करण्यात आली असली, तरी आतापर्यंत शहरासह जिल्ह्यात दररोज एक लाख नागरिकांचे लसीकरण करणे शक्य झालेले नाही. प्रशासनाने दररोज ९० हजार ते एक लाखांपर्यंत लसीकरणाची तयारी केली आहे. मात्र, लसीचा साठा मर्यादित असल्याने पूर्ण क्षमतेने लसीकरण करण्यात अडचणी येत आहेत.
'राज्याला मागणीनुसार लसी उपलब्ध करून द्याव्या'
महाराष्ट्रात दरोरोज साडेचार लाख लसीकरण करण्यात येत आहे. उपलब्ध साड्यानुसार आपल्याला तीन ते चार दिवस लसीकरण करता येणार आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याला मागणीनुसार लसी उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी देखील यावेळी डॉ. पाटील यांनी केली आहे. जर केंद्र सरकारने लसी उपलब्ध करून दिली तर चांगल्या पद्धतीने लसीकरण महोत्सव करता येईल. सध्या ९ लाख डोस उपलब्ध असून ते पुढील दोन दिवस जाणार आहे. अजून १२ लाख डोस मिळणार असून ते देखील ३ ते चार दिवस जाणार आहेत. म्हणजेच साधारणतः ५ ते ६ दिवस साठा चालेल.