पुणे - ठाकरे सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांच्या दोन वर्षांच्या कामगिरीबाबत माध्यमांनी पुण्यात आलेले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis Comment On Thackeray Government ) यांना प्रतिक्रिया मागितली. त्यावर नेमकी सरकारची कामगिरीच काय आहे? की ज्यावर मी बोलू. जिथे कामगिरी असते तिथे मुल्यमापन केले जाते. सरकारची कामगिरीच नाही, त्यामुळे मुल्यमापन करण्याचा प्रश्नच येत नाही. तसेच, मला आनंद आहे की, आजही राज्यातील नंबर १ चा पक्ष हा भाजपच आहे, असे यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हेही वाचा - Rampath Yatra special train पुणे रेल्वे स्टेशन येथून अयोध्येला रामपथ स्पेशल रेल्वे रवाना
या शिवसृष्टीसाठी जी काही मदत करता येईल ती निश्चितपणे करू
देवेंद्र फडणवीस यांनी आज बाबासाहेब पुरंदरे ( Devendra Fadnavis Meet Babasaheb Purandare Family ) यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. ते म्हणाले की, दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ( Babasaheb Purandare ) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार त्यांची सेवा करत प्रत्येक व्यक्ती तसेच, युवकांपर्यंत पोहचवले. बाबासाहेबांनी जे स्वप्न बघितले होत की, अतिशय उत्तम अशा प्रकारची शिवसृष्टी तयार व्हावी, हे त्यांनी हाती घेतलेले काम हे अपूर्ण आहे. हे एका व्यक्तीचे काम नव्हे तर, त्याच्यासाठी संपूर्ण समाजाला उभे राहावे लागणार आहे. आम्हाला या शिवसृष्टीसाठी जी काही मदत करता येईल ती निश्चितपणे करू. हे सर्व शिवप्रेमींचे स्वप्न आहे. आणि ही जबाबदारी देखील आहे की, जागतिक दर्जाची शिवसृष्टी ही तयार व्हायाला हवी. आमचे सरकार असताना आम्ही शिवसृष्टीला दर्जा दिलेला आहे. आता केंद्र आणि राज्याला मदत करायची असेल तर, काहीच अडचण नाही.
काल दिल्लीत माझी कुठलीही राजकीय भेट नव्हती
काल दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याबरोबर जी माझी बैठक झाली होती, ती राजकीय भेट नव्हती. मी दिल्लीला गेलो की आमच्या नेत्यांशी बोलत असतो. कालची बैठक ही संघटनात्मक बैठक होती. चंद्रकांत पाटील आणि मी आम्ही दोघेही संघटनात्मक बैठकीसाठी गेलो होतो, अशी माहिती देखील फडणवीस ( Devendra Fadnavis in Pune ) यांनी दिली.
हेही वाचा - Solapur Highway Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर 6 जणांना चिरडले; 3 ठार, 3 जखमी