पुणे - खेळ असो किंवा राजकारण यामध्ये ( 2019 election ) माणसाने कधीही आत्मसंतुष्ट असू नये. २०१९ मध्ये ( Devendra Fadnavis comment on 2019 election ) सत्तेच्या खेळाचे आम्हीच ग्रँडमास्टर ( Devendra Fadnavis attend Open Grandmaster Chess Tournament ) होतो. सत्तेचा डाव देखील मांडला होता. परंतु, आम्ही समोरील खेळाडूची चाल समजू शकलो नाही, अशी स्पष्ट कबुली माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या वतीने आयोजित व अखिल भारतीय बुद्धिबळ ( Open Grandmaster Chess Tournament pune ) संघटना यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या पहिल्या महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय ओपन ग्रॅन्डमास्टर बुद्धिबळ स्पर्धेला श्री शिवछत्रपती क्रीडानगरी, बालेवाडी येथे काल प्रारंभ झाला. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी देवेंद्र फडणवीस बोलत होते.
कोणताही खेळ खळताना त्यातील खाचाखोचा नीट समजवून घ्या, असे सांगून देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राने देशाला अनेक ग्रॅन्डमास्टर दिले आहेत आणि आता युवा खेळाडू तोच वारसा पुढे चालवीत आहेत. या स्पर्धेत खेळाडूंचा भरघोस सहभाग पाहून मला खूपच आनंद होत आहे. फिडे नियमानुसार ही स्पर्धा होत असल्याने अनेकांना या स्पर्धेतून ग्रॅन्डमास्टर किंवा आंतरराष्ट्रीय मास्टर नॉर्म मिळविण्याची संधी आहे. खेळाडू वृत्ती, खेळभावना आणि स्पर्धात्मकता हे गुण ज्याच्याकडे असतात, तो स्पर्धाही जिंकतो आणि खर्या आयुष्यातही यश मिळवितो.
बुद्धिबळ आणि राजकारणात आपल्याला समोरील खेळाडूच्या डोक्याचा आभ्यास करता येणे फार महत्त्वाचे असते. मी आणि देवेंद्र फडणवीस एकाच भागातील असल्याने अनेक खेळ आम्ही नगपूर महानगरपालिकेत देखील एकत्र खेळलो आहे, असे यावेळी सुनील केदार यांनी सांगितले.
'खेलो इंडिया' स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे सराव व प्रशिक्षण शिबीर चालू असल्याचे सांगून सुनील केदार म्हणाले की, या सगळ्याचा पुरेपूर फायदा खेळाडू निश्चितच करून घेतील. महाराष्ट्रात या वर्षा अखेरपर्यंत अत्याधुनिक सुविधांनी युक्त असे क्रीडा विद्यापीठ सुरू होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
या स्पर्धेत भारतासह 24 देशांमधील 140 खेळाडूंनी सहभाग घेतला असून त्यात 17 ग्रॅन्डमास्टर्स, महिला ग्रॅन्डमास्टर्स आणि 29 आंतरराष्ट्रीय मास्टर्स खेळाडूंचा सहभाग आहे. या स्पर्धेत 2 हजारपेक्षा जास्त एलो गुणांकन असलेल्या खेळाडूंचा सहभाग आहे.
यावेळी क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, प्रसाद लाड, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष डॉ. परिणय फुके, कार्याध्यक्ष सिद्धार्थ मयूर, वरिष्ठ उपाध्यक्ष ग्रॅन्डमास्टर अभिजित कुंटे, उपाध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे व गिरीश चितळे, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे माजी अध्यक्ष व निमंत्रक अशोक जैन आणि मानद सचिव निरंजन गोडबोले आदी मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा - Attacked by Minors : इंस्टाग्रामवर स्टेटस् ठेवल्याच्या रागातून अल्पवयीन टोळक्याचा मित्रावर खूनी हल्ला