पुणे - महाराष्ट्र विधानपरिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन आणि भाजपाचे 5 असे 11 उमेदवार रिंगणात असल्याने निवडणुकीत चुरस वाढली आहे. पुण्यातील भारतीय जनता पक्षाच्या आमदार मुक्ता टिळक ( BJP MLA Mukta Tilak left for Mumbai ) या राज्यसभेप्रमाणेच विधान परिषदेच्या मतदानासाठी मुंबईला रवाना झाल्या आहेत.
हेही वाचा - APMC Market Rate : एपीएमसी मार्केटमध्ये कोथिंबीरचे दर उतरले; इतर भाज्यांचे दर स्थिर
राज्यसभा निवडणुकी नंतर कोणताही दगा फटका होऊ नये यासाठी प्रत्येक पक्ष आपापल्या आमदाराला मुंबईतील हॉटेलमध्ये ठेवले आहेत. भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि पुण्यातील कसबा पेठच्या आमदार मुक्ता टिळक हे गंभीर आजारांनी ग्रस्त असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मात्र निवडणुकीसाठी ते आज पहाटेच मुंबईला रवाना झाले. व्हीलचेअरवरून हे दोन्ही आमदार मतदानासाठी येणार आहेत. जगताप यांना एअर अॅम्बुलन्सने विधानभवनात आणण्यात येणार आहे. तर, मुक्ता टिळक हे स्वतः आपल्या गाडीतून मुंबईला रवाना झाल्या आहेत.
विधान परिषदेचे आज मतदान असून सर्व पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. यात भाजप देखील मागे नाही. पक्षाने दिलेले आदेश मानायचे हे पहिल्यापासून आमच्या रक्तात आहे. त्यामुळे मी आज पक्षाच्या मतदानासाठी जात आहे, असे मुक्ता टिळक म्हणाल्या.
हेही वाचा - Maharashtra monsoon 2022 : संपूर्ण राज्यात व्यापला मान्सून, आजपासून जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज