ETV Bharat / city

'व्यापाऱ्यांच्या आग्रहामुळेच पुण्यातील लॉकडाऊन हटवला' - पुणे लॉकडाऊन न्यूज

सोमवारी पांडुरंग रायकर मृत्यू प्रकरणी अहवाल येणार आहे. तसेच याप्रकरणात ताबडतोब सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

ajit pawar
अजित पवार
author img

By

Published : Sep 5, 2020, 6:02 PM IST

Updated : Sep 5, 2020, 6:28 PM IST

पुणे - व्यापाऱयांच्या आग्रहामुळेच पुण्यातील लॉकडाऊन हटवावं लागलं असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. तसेच पुण्यातील लॉकडाऊन हे हळूहळू उठवावे असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे होते, असे अजित पवार म्हणाले. पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, शरद पवार, पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील विधानभवन येथे बैठक पार पडली. या बैठकीला पुणे जिल्ह्यातील आमदार, खासदार आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, पुण्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये अँटीजेन टेस्ट वाढवण्यात येणार आहेत. तसेच 25 ते 30 टक्के नागरिक मास्क घातल नसून, सर्वांनी मास्क घालणे गरजेचे आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करूनच सर्व कामे करावीत, असे आवाहन अजित पवार यांनी नागरिकांना केले आहे.

पुण्यातील कोरोनाच्या चाचण्या वाढवल्या जातील. मास्क व थुंकणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. तसेच जनजागृती व जनसहवास वाढवला पाहिजे, असे अजित पवार यांनी सांगितले. पुण्यातील हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता आता भासू लागली आहे. याबाबत केंद्र सरकारला माहिती दिली आहे. रुग्णवाहिकांबाबत तक्रारी आल्या असून, पीएमसी व विभागीय आयुक्त यांना याबाबत दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचे पवार म्हणाले.

दरम्यान, पुण्यातील जम्बो हॉस्पिटलबाबत ठेकेदाराला जमत नसेल तर बदलण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली आहे. तसेच जम्बो कोविड रुग्णालय सुरू करण्यासाठी घाई झाली नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले. लॉकडाऊन उठवण्याबाबत वेगवेगळी मते होती. मुख्यमंत्र्यांचे मत होते की, हळूहळू मुंबईसारखे पुण्यातील लॉकडाऊन उठवायला हवे होते. पण व्यापारी व इतर काहींची मते वेगळी होती, असेही अजित पवार यांनी या बैठकीनंतर सांगितले.

पत्रकार पांडुरंग रायकर मृत्यू प्रकरण -

Last Updated : Sep 5, 2020, 6:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.