ETV Bharat / city

Ajit Pawar on Government : ...तोपर्यंत उद्धव ठाकरेंचं सरकार टिकणार; अजित पवार यांचं स्पष्टीकरण - अजित पवार पुण्यात

प्रत्येकाने हे बघितलं आहे की कोणीतरी एखादा व्यक्ती पहाटे 3 वाजता ट्विट करतो आणि त्यानंतर 5 वाजता अधिकरी येत असतात. मंत्री नवाब मलिक यांचे प्रकरण हे 1993 चे आहे. आज 2022 आहे. न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून ते आपली भूमिका मांडत आहे. सरकार येतात आणि जातात पण द्वेषभावनेतून ज्याने त्याने कस वागावं हे त्याने ठरवावं, असे यावेळी पवार म्हणाले.

Ajit Pawar
Ajit Pawar
author img

By

Published : Feb 26, 2022, 10:46 AM IST

Updated : Feb 26, 2022, 12:05 PM IST

पुणे - अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, आरोप प्रत्यारोपमध्ये महाराष्ट्र पुढे जाणार नाही. ज्यांना काय म्हणायचं आहे ते त्यांना म्हणू द्या.आम्हाला आमचं काम भलं आम्ही भले. याबाबत पक्षाचे नेते शरद पवार यांनी भूमिका मांडली आहे. जे आज तारखा देत आहे. त्यांना तारख्या देऊ द्या. ज्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जेव्हापासून महाविकास आघाडी सरकार आले आहे, तेव्हापासून विरोधीपक्षाच्या नेत्यांकडून तारखा दिल्या जात आहे. तोपर्यंत 145 ची मॅजिक फिगर उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभी आहे. तसेच जो पर्यंत हे तिन्ही पक्ष एकत्र आहे. तोपर्यंत हे सरकार चालणार. ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असे यावेळी अजित पवार म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तळजाई येथील वन उद्यानाचे उद्घाटन झाले, यावेळी ते बोलत होते.

...तोपर्यंत उद्धव ठाकरेंचं सरकार टिकणार; अजित पवार यांचं स्पष्टीकरण

अजित पवार पुढे म्हणाले, प्रत्येकाने हे बघितलं आहे की कोणीतरी एखादा व्यक्ती पहाटे 3 वाजता ट्विट करतो आणि त्यानंतर 5 वाजता अधिकरी येत असतात. मंत्री नवाब मलिक यांचे प्रकरण हे 1993 चे आहे. आज 2022 आहे. न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून ते आपली भूमिका मांडत आहे. सरकार येतात आणि जातात पण द्वेषभावनेतून ज्याने त्याने कस वागावं हे त्याने ठरवावं, असे देखील यावेळी पवार म्हणाले.

  • Around 1200-2000 people from Maharashtra are stranded in Ukraine. We are working closely with the Centre to bring back everyone safely: Maharashtra Deputy CM Ajit Pawar pic.twitter.com/LrjFYKdIhQ

    — ANI (@ANI) February 26, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मराठी भाषेतील बोर्ड लावण्यात काय हरकत

मराठी भाषेबाबत देखील सरकार प्रयत्नशील असून नुकतंच मराठी पाट्यांबाबत देखील निर्णय घेण्यात आला आहे. पण त्याहीविरोधात काहीजण कोर्टात गेले आणि त्यांना तिथं चपराक बसली. महाराष्ट्रात राहताय तर मराठी भाषेत बोर्ड लावण्यात काय हरकत आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला पाहिजे, यासाठी आम्ही देखील प्रयत्न करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांची ही भाषा आहे. सर्वजण महाराजांच नाव घेतात. अभिजात दर्जा द्यायचं का हे केंद्राच्या हातात आहे, असं यावेळी पवार म्हणाले.

सरकार म्हणून प्रयत्न सुरू

जगात तिसरं महायुद्ध होतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पण युद्ध करून काहीही होत नाही. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले आहे. युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय विद्यार्थी अडकले आहे. राज्यातील 366 विद्यार्थ्यांची विनंती नोंदविला गेली असून त्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न देखील केले जात आहे. त्यातील 32 मुलं ही दिल्लीत आज परत येणार आहे. राज्य सरकार म्हणून जे जे काही करता येईल ते ते प्रयत्न आम्ही करत आहो. आणि याचा सर्व खर्च देखील महाराष्ट्र सरकार करणार आहे, असं देखील यावेळी पवार म्हणाले.

...सरकार म्हणून आम्ही स्वागत करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या 6 तारखेला पुणे दौऱ्यावर येत असून राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने गो बॅक मोदी अशी घोषणा दिली जात आहे. यावर पवार यांना विचारलं असता ते म्हणाले, की देशाचे पंतप्रधान जे असतात त्यांचं मानसन्मान ठेवण हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. ते देशाच्या कुठल्याही भागात येऊ शकतात. तो त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या सन्मानासाठी मुख्यमंत्री आणि मी देखील उपस्थित राहणार आहे. सरकार म्हणून आम्ही आमचं काम करणार आहे. तर पक्ष म्हणून पक्षाची भूमिका असणार आहे, असे देखील पवार यावेळी म्हणाले.

Last Updated : Feb 26, 2022, 12:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.